मुंबई: सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन मुंबईत सुरु आहे. दरम्यान आज अधिवेशनात राज्य सरकारकडून जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आले. दरम्यान आवाजी मतदानाने जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. अखेर जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले होते. अखेर हे विधेयक मंजूर झाले आहे.
जनसुरक्षा विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. आवाजी मतदान घेत हे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर झाले आहे. आता हे विधयेक विधानपरिषदेत मांडण्यात येणार आहे. त्या ठिकाणी हे विधेयक मंजूर झाल्यावर हे विधेयक राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे स्वाक्षरीसाठी जाईल. राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यावर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होणार आहे.
काय आहे जनसुरक्षा विधेयक?
आज हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले आहे. या कायद्यानुसार जर एखादी व्यक्ती सार्वजनिक किंवा राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण करत असेल तर त्या व्यक्तीला तातडीने ताब्यात घेता येऊ शकते. हा जनसुरक्षा कायदा अंतर्गत सुरक्षेशी संबंधित आहे. या कायद्यामुळे शहरी नक्षलवाद आणि नक्षली चळवळींना मोठा धक्का बसणार आहे. शहरी नक्षलवाद खिळखिळा करण्यासाठी या कायद्याची मदत होणार आहे. या कायद्यांतर्गत अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संघटना किंवा व्यक्ती, नक्षलवादी व माओवादी संघटनांवर कारवाई केली जाणार आहे.
देशातील नक्षलग्रस्त असणाऱ्या राज्यांमध्ये आधीपासून हा कायदा अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात असा कोणता कायदा नव्हता. महाराष्ट्राला अशा प्रकरणात कारवाई करण्यासाठी केंद्राच्या टाडा कायद्याचा आधार घ्यावा लागत होता. मात्र आता जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर झाले आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यावर महाराष्ट्र सरकार नक्षलवाद रोखण्यासाठी अधिक सक्षम होणार आहे. दरम्यान हा कायदा कोणत्याही डावा विचारांच्या, संघटना किंवा पक्षाच्या विरोधात नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.