Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी पूर्ण; लवकरच दिलासा मिळणार…

१९९० पासूनचे थकबाकीदार आणि वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचीही माहिती आहे. कर्जमाफीच्या अभ्यासासाठी समितीची नेमणूक राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी समिती नेमली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 15, 2026 | 01:47 PM
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी पूर्ण; लवकरच दिलासा मिळणार...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी पूर्ण; लवकरच दिलासा मिळणार...

Follow Us
Follow Us:

नांदेड : राज्यातील 14 जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकीदार असून, त्यात विदर्भातील नागपूर, अमरावती, बुलढाणा या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यासाठी ३० जून २०२५ व ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाने बँकांकडून मागविली आहे.

१९९० पासूनचे थकबाकीदार आणि वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचीही माहिती आहे. कर्जमाफीच्या अभ्यासासाठी समितीची नेमणूक राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी समिती नेमली असून, या समितीचा अहवाल पुढील दीड महिन्यात शासनाला सादर होणार आहे. सध्या सर्वच शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष लागले आहे. ज्यांची माहिती शासनाला जाणार नाही, तेथील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात, असेही बोलले जात आहे. दरम्यान, थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार की काही लाखांची कर्जमाफी मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेदेखील वाचा : शेतकरी कर्जमाफीवर कृषिमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा; शेतकऱ्यांना सरसकट लाभ मिळणार, 30 मार्चपूर्वी…

दीर्घकालीन उपाययोजना आणि कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे. कर्जमाफीसाठी साधारणतः ४० हजार कोटी रुपये लागणार आहेत. ३० जून २०२५ पर्यंत राज्यातील २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांकडे ३५ हजार ४७७ कोटींची थकबाकी आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांतील नियमित कर्जदार शेतकऱ्यांचीही माहिती सहकार विभागाने मागविली असून, त्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा महत्त्वपूर्ण

राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे. या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या घोषणेकडे लागून असतात. यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासाही मिळतो. त्यातच आता राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा सरसकट लाभ दिला जाईल, अशी घोषणा यापूर्वीच केली होती. त्यानंतर आता ही नवीन माहिती समोर आली आहे.

हेदेखील वाचा : टिपू सुलतान हा पाकिस्तानचा नायक तर क्रिकेटचा सामना कशाला? खासदार संजय राऊतांची मॅचवरुन राजकीय टीका

Web Title: Preparations for farmers loan waiver completed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Farmer Loan Waiver
  • Government Decision
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर
1

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर

Devendra Fadnavis : 2030 पर्यंत जेएनपीटी देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
2

Devendra Fadnavis : 2030 पर्यंत जेएनपीटी देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंसाठी मोठा निर्णय! खेळाडूंच्या ५% आरक्षणापासून ‘प्रगती’ आरोग्य प्रकल्पाला हिरवा कंदील
3

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंसाठी मोठा निर्णय! खेळाडूंच्या ५% आरक्षणापासून ‘प्रगती’ आरोग्य प्रकल्पाला हिरवा कंदील

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
4

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.