AI Generated Image
शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी असून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सामायिक शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराबाबत उपयुक्त बातमी समोर आली असून या व्यवहारांबाबत महसूल विभागाने नवी कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. (Maharashtra Government)
एकाच 7/12 उताऱ्यावर अनेक सहहिस्सेदारांची नावे असतील, तर त्यातील एखाद्या व्यक्तीला आपला हिस्सा विकताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याबाबत महसूल विभागाने कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. या नियमांमध्ये भूमिअभिलेख विभागाच्या मोजणीच्या ‘क’ प्रतीला विशेष महत्त्व आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हि नवी कार्यपद्धती लागू कारण्यात आली आहे.
सामायिक 7/12 उताऱ्यावरील जमिनीतील आपला हिस्सा विकायचा असल्यास संबंधित सहहिस्सेदाराने भूमिअभिलेख विभागाकडून मिळालेली मोजणीची ‘क’ प्रत विक्रीच्या दस्तासोबत जोडणे महत्त्वाचे आहे.
ही प्रत दस्तासोबत जोडलेली असल्यास इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मागितल्याशिवाय दुय्यम निबंधकांना दस्ताची नोंदणी करता येईल, अशी कार्यपद्धतीत तरतूद आहे.
इथेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. विक्री करायच्या जमिनीच्या भागाची मोजणीची ‘क’ प्रत उपलब्ध करून दिली नाही किंवा ती दस्तासोबत जोडली नाही, तर इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा NOC आवश्यक राहील.
अशी संमती दस्ताचा भाग म्हणून जोडलेली नसेल, तर संबंधित दस्ताची नोंदणी करता येणार नाही, असं दिलेल्या कार्यपद्धतीत स्पष्ट करण्यात आलं आहे.
सामायिक जमिनीच्या व्यवहारात कागदपत्रांची पूर्तता करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे जमीन विक्रीचा निर्णय घेण्यापूर्वी मोजणीची ‘क’ प्रत उपलब्ध आहे का, ती दस्तासोबत जोडली आहे का आणि आवश्यक असल्यास इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती घेतली आहे का, हे तपासून घ्या.
जमीन खरेदी करणाऱ्यांनीही केवळ 7/12 उतारा पाहून व्यवहार निश्चित करू नये. विक्री होणाऱ्या हिस्स्याची ओळख, मोजणीची कागदपत्रे आणि संबंधित नोंदींची खातरजमा करणं फायद्याचं ठरेल.
या कार्यपद्धतीचा उद्देश सामायिक जमिनीच्या हिस्सा विक्री प्रक्रियेत स्पष्टता आणणे आणि भविष्यात उद्भवणारे वाद कमी करण्यास मदत करणे हा आहे. मात्र, विशिष्ट व्यवहारात कोणती कागदपत्रे लागू होतील, यासाठी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालय आणि भूमिअभिलेख कार्यालयाकडून खात्री करून घ्यावी.
Ans: विक्रीच्या दस्तासोबत मोजणीची ‘क’ प्रत जोडलेली असल्यास इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा NOC मागण्याची आवश्यकता नाही.
Ans: ‘क’ प्रत जोडलेली नसल्यास इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. ही संमती दस्तासोबत जोडलेली नसेल, तर नोंदणी करता येणार नाही.
Ans: सामायिक 7/12 उताऱ्यावर नाव असलेल्या सहहिस्सेदारांना आणि जमीन खरेदी करणाऱ्यांना आवश्यक कागदपत्रांबाबत स्पष्टता मिळण्यास मदत होईल. त्यामुळे वादग्रस्त व्यवहारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.






