Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्.... , काही तास अत्यंत महत्वाचे
Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मुंबई, पालघर, कोकणाला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. राज्यातील सवर्च भागात अत्यंत मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत तर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. दरम्यान सध्या राज्यभरात कुठे कुठे पाऊस सुरु आहे आणि काय स्थिती निर्माण झाली आहे याचा एक आढावा घेऊयात.
मुंबईत मुसळधार
गेल्या चार दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. काल रात्रीपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. कोकण आणि मुंबई भागात अतिवृष्टी झाल्यासारखा पाऊस कोसळत आहे. शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. प्रशासन सतर्क झाले आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पुढील तीन ते चार तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणाला झोडपले
गेले काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसाने कोकण किनारपट्टीला झोडपून काढले आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात अति ते अति मुसळधार पाऊस सुरु असल्याने वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी काही सखल भागात साचण्यास सुरुवात झाली आहे. जगबुडी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील अति मुसळधार पाऊस सुरु आहे.
#पुणे जिल्ह्यासाठी आज #येलोअलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.नागरिकांनी सतर्क राहावे-जिल्हा प्रशासनाचे आवाहन.#PuneRains pic.twitter.com/JciL2f4fcX
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 19, 2025
सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार
सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणातून कोयना नदीपात्रात ५३०० क्युसेक ने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. पंचगंगा नदी पात्राबाहेर आली आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही तास राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
#खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून #मुठानदी पात्रामध्ये सकाळी ९ वाजता ४ हजार १७० क्यूसेक विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये. खबरदारी घ्यावी-मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट, पुणे
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 19, 2025
पुण्यात देखील मुसळधार
पुणे शहरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अणे ठिकाणी वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना बसला आहे. खडकवासला धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात काय स्थिती?
विदर्भ आणि मराठवाड्यातील देखील काही जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सरकार आणि प्रशासनाने केले आहे.