
Maharashtra municipal elections, voting date and time, 29 municipal corporations, BMC election,
Maharashtra Municipal Election Voting Date And Time: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक प्रचाराच्या तोफा आज सायंककाळी ५ वाजता शांत होतील. नियमांनुसार, मतदानाच्या दिवसाच्या ४८ तास आधी निवडणूक प्रचार थांबवण्यात येतो. या सर्व महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होतील.
बृहन्मुंबई महानगरपालिका ( BMC) आणि नागपूर महानगरपालिका ( NMC) यासह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होईल. मतदानानंतर, १६ तारखेला निवडणूक निकाल जाहीर केले जातील. शुक्रवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. पण त्यापूर्वी यावेळी प्रभागरचनेत बदल झाल्यामुळे मतदान पक्रियेतही बदल झाला आहे.
पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या आणि इतर मतदारांच्या सोयीसाठी, मतदान प्रक्रिया टप्प्याटप्प्याने विभागली गेली आहे:
पडताळणी: मतदान केंद्रावरील पहिला अधिकारी मतदार यादीत तुमचे नाव आणि ओळखपत्र पडताळेल.
शाई आणि स्वाक्षरी: दुसरा अधिकारी तुमच्या बोटाला अमिट शाई लावेल आणि रजिस्टरवर तुमची स्वाक्षरी घेईल (फॉर्म १७अ).
स्लिप जुळवणे: तिसऱ्या अधिकाऱ्याला तुमची स्लिप दाखवा आणि मतदान कक्षात जा.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट: इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर ( EVM)वर तुमच्या पसंतीच्या उमेदवाराच्या चिन्हाचे बटण दाबा. त्यानंतर उमेदवाराचे नाव आणि चिन्ह व्हीव्हीपॅट मशीनवर ७ सेकंदांसाठी दिसेल, ज्यामुळे तुमचे मत निश्चित होईल.
नोटा पर्याय: जर तुम्हाला कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नसेल, तर तुम्ही ‘नोटा’ बटण देखील दाबू शकता.
मतदान केंद्रांवर शिस्त राखण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. बूथमध्ये मोबाईल फोन, कॅमेरा किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट सक्त मनाई आहे. मतदारांनी त्यांचे वैध मतदार ओळखपत्र (ईपीआयसी) किंवा निवडणूक आयोगाने मंजूर केलेले इतर ओळखपत्र बाळगावे. मागील कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपल्याने, सध्या बीएमसीचे प्रशासन सरकारने नियुक्त केलेल्या महापालिका आयुक्त (प्रशासक) पाहिले जातेय.
Raj Thackeray Thane Speech: पाच पाच हजार रुपये तोंडावर फेकून मते मिळवण्याची हिंमत आली कुठून?
राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १५ जानेवारी ही मतदानाच्या दिवशी संबंधित भागात सार्वजनिक सुट्टी असेल. ही सुट्टी सरकारच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये (२४ सार्वजनिक सुट्ट्या) नव्हती, परंतु निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आणि मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेषतः जाहीर करण्यात आली होती. १६ जानेवारी रोजी मतमोजणी होईल.
ही सुट्टी संपूर्ण राज्यात नाही तर फक्त २९ महानगरपालिका क्षेत्रांना लागू होईल जिथे निवडणुका होणार आहेत. प्रमुख प्रभावित क्षेत्रे अशी आहेत:
मुंबई महानगर क्षेत्र: मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा (बीएमसी क्षेत्र).
पुणे विभाग: पुणे (पीएमसी) आणि पिंपरी-चिंचवड (पीसीएमसी).
ठाणे जिल्हा: ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि भिवंडी.
उत्तर महाराष्ट्र: नाशिक, मालेगाव, जळगाव आणि धुळे.
विदर्भ आणि मराठवाडा: नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), लातूर आणि नांदेड.
इतर शहरे: सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि अहिल्यानगर (अहमदनगर)
सुट्टीच्या घोषणेचा सार्वजनिक सुविधा आणि संस्थांवर व्यापक परिणाम होईल:
सरकारी कार्यालये: सर्व राज्य सरकारी विभाग आणि निमसरकारी कार्यालये बंद राहतील.
केंद्र सरकारी कार्यालये: ज्या महानगरपालिका क्षेत्रात निवडणुका होत आहेत त्या क्षेत्रात येणारी केंद्रीय कार्यालये देखील बंद राहतील.
शैक्षणिक संस्था: सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील, कारण बहुतेक कॅम्पस मतदान केंद्र म्हणून वापरले जातील.
महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक, मतदान दिनांक वेळ, २९ महानगरपालिका, बीएमसी निवडणूक, नागपूर महानगरपालिका, १५ जानेवारी मतदान, १६ जानेवारी निकाल, मतदान प्रक्रिया, ईव्हीएम व्हीव्हीपॅट, नोटा पर्याय, मतदार सूचना, निवडणूक नियम