
दरम्यान, जामनेर, अंजनगर आणि दोंडाईचा या तीन नगरपंचायतींमधील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान झाले नाही. त्यामुळे या नगरपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया न होता थेट निकाल जाहीर झाले आहेत.
उर्वरित राज्यातील 287 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी प्रक्रिया सुरू असून, या निकालांमधून स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे स्पष्ट होणार आहेत. राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आजच्या निकालांकडे केंद्रित झाले आहे.
राज्यातील नगरपरिषद निवडणूक निकालांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे राजकीय चित्र पाहायला मिळत आहे. सातारा नगरपालिकेत अपक्ष उमेदवारांनी बाजी मारत मतदारांचा स्पष्ट कौल मिळवला आहे. मयूर कांबळे आणि जयश्री जाधव यांनी निवडणुकीत विजय मिळवत नगरपालिकेवर आपली पकड मजबूत केली आहे.
सासवड नगरपरिषद
दरम्यान, सासवड नगरपरिषदेत भाजपने जोरदार कामगिरी करत प्रभाग क्रमांक 2 आणि 9 मधील चारही जागांवर विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार दिनेश भिंताडे, लिना वढणे, प्रदीप राऊत आणि प्रियंका जगताप हे सर्व विजयी झाले असून, सासवडमध्ये भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायतीत मात्र निकालांनी वेगळेच चित्र समोर आणले आहे. येथे राजर्षी शाहू विकास आघाडीने सहा जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. तर भाजप–शिवसेना युतीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.
विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः चंदगड नगरपंचायतीसाठी प्रचार केला होता. मात्र तरीही युतीला अपेक्षित यश मिळाले नाही, त्यामुळे या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
तुळजापुरात भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे 1770 मतांनी विजयी
मुक्ताईनगरमध्ये शिंदे सेनेच्या संजना पाटील विजयी
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे विजयी घोषित
– गेवराईत भाजपच्या गीता पवार विजयी
रायगड कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे विजयी
अहिल्यानगरमध्ये ३० पैकी २८ जागांवर बाळासाहेब थोरात यांचे उमेदवार आघाडीवर
विटा नगरपरिषद
नगराध्यक्ष: काजल म्हेत्रे (शिवसेना – शिंदे गट)
एकूण जागा: 26
नगरसेवक निकाल
शिवसेना (शिंदे) – 22
भाजप – 4
नगराध्यक्ष: आनंदराव मलगुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)
एकूण जागा: 30
नगरसेवक निकाल
राष्ट्रवादी (शरद पवार) – 23
अजित पवार गट – 3
भाजप – 2
ठाकरे शिवसेना – 2
नगराध्यक्ष पद: पृथ्वीसिंग नाईक (शिवसेना – शिंदे गट) आघाडीवर
जागा आघाडी
शिवसेना-भाजप – 11
दोन्ही राष्ट्रवादी – 6
ईश्वरपूर – आनंदराव मलगुंडे (राष्ट्रवादी शरद पवार)
आष्टा – विशाल शिंदे (राष्ट्रवादी शरद पवार)
तासगाव – विजया सावंत (स्वाभिमानी विकास आघाडी)
पलूस – संजीवनी पूदाले (काँग्रेस)
विटा – काजल म्हेत्रे (शिवसेना शिंदे)
जत – रवींद्र आरळी (भाजप)
आटपाडी नगरपंचायत – उत्तम जाधव (भाजप)
शिराळा नगरपंचायत – पृथ्वीसिंग नाईक (शिवसेना शिंदे)
नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांपैकी ८ ठिकाणी महायुतीचा विजय झाला आहे.
महायुती
भाजप – 2
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 3
शिवसेना (शिंदे) – 3
महाविकास आघाडी
ठाकरे शिवसेना – 0
राष्ट्रवादी (शरद पवार) – 0
काँग्रेस – 0
भगूर – प्रेरणा बलकवडे (अजित पवार गट)
पिंपळगाव बसवंत – डॉ. मनोज बर्डे (भाजप)
सिन्नर – विट्ठलराजे उगले (अजित पवार गट)
इगतपुरी – शालिनी खताळे (शिवसेना शिंदे)
येवला – राजेंद्र लोणारी (अजित पवार गट)
नांदगाव – सागर हिरे (शिवसेना शिंदे)
सटाणा – हर्षदा पाटील (शिवसेना शिंदे)
चांदवड – वैभव बागुल (भाजप)
जागा निकाल
काँग्रेस + शेतकरी संघटना – 16
भाजप – 4
अपक्ष – 1
काटोल
अर्चना देशमुख (राष्ट्रवादी शरद पवार + शेकाप) 2376 मतांनी विजयी
भाजप – 9
काँग्रेस – 1
शिवसेना (शिंदे) – 1
शेकाप-राष्ट्रवादी (शरद पवार) – 1
उमरेड
भाजपच्या प्राजक्ता कारू 5198 मतांनी आघाडीवर
भाजप – 11 | काँग्रेस – 5
भाजप – 129
शिवसेना (शिंदे) – 47
काँग्रेस – 35
राष्ट्रवादी (अजित पवार) – 32
शिवसेना (ठाकरे) – 9
राष्ट्रवादी (शरद पवार) – 8