Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Mayoral Election: मुंबई उपमहापौरपदासाठी मोठी फिल्डिंग:शिंदे गटाकडून दोन महिला नेत्या मैदानात

मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपच्या महापौरपदासाठी शीतल गंभीर-देसाई आणि रितू तावडे यांची नावे आघाडीवर आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 05, 2026 | 09:57 AM
BMC Election 2026, BMC Election Result 2026, BMC Election Result 2026 Live Updates,

BMC Election 2026, BMC Election Result 2026, BMC Election Result 2026 Live Updates,

Follow Us
Close
Follow Us:
  • ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईला नवा महापौर मिळणार
  • कोणत्याही नगरसेवकाने मुंबईबाहेर जाऊ नये
  • उपमहापौरपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिले जाणार
BMC Mayoral Election: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईला नवा महापौर मिळणार आहे. मुंबई महापालिकेवर यंदा भाजपचा महापौर बसणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, महायुतीमध्ये सत्तेचे सूत्रही ठरल्याचे सांगितले जात आहे.

निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे:

७ फेब्रुवारी २०२६: महापौरपदासाठी नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार.

११ फेब्रुवारी २०२६ (दुपारी १२:०० वाजता): विशेष सभेचे आयोजन आणि महापौरपदाची अधिकृत घोषणा.

अर्ज माघार: सभागृह सुरू होण्यापूर्वी १५ मिनिटे आधीपर्यंत अर्ज मागे घेता येईल.

Solapur Crime: आमदारांच्या घराशेजारी रक्तरंजित घटना; ऊसतोड मजुराने पत्नीची निर्घृण हत्या

महायुतीचे सत्तेचे समीकरण:

मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपच्या महापौरपदासाठी शीतल गंभीर-देसाई आणि रितू तावडे यांची नावे आघाडीवर आहेत. उपमहापौरपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिले जाणार आहे. हे पद महिलेला मिळण्याची दाट शक्यता असून, दोन अनुभवी नगरसेविकांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

सुधार समितीचे अध्यक्षपदही शिंदे गटाला मिळणार असून, या पदावर पुरुषाची वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा) गटानेही मोर्चेबांधणी सुरू केली असून, संख्याबळ नसतानाही ते उमेदवार उभा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उपमहापौरपदासाठी रस्सीखेच

महापौर पदासाठी रूपा राणी निकम यांच्या निवडीनंतर आता उपमहापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दोन दिग्गज महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

१. तृष्णा विश्वासराव:
तृष्णा विश्वासराव या शिवसेनेच्या (शिंदे गट) अत्यंत अनुभवी नेत्या मानल्या जातात. २०१४ मध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिकेत पहिली महिला सभागृह नेते म्हणून काम पाहिले आहे. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आणि पक्षावरील निष्ठा यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे.

२. यामिनी जाधव:
यामिनी जाधव या देखील पक्षाच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. २०१४ मध्ये महापौरपद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित असताना यामिनी जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, ऐनवेळी स्नेहल आंबेकर यांची निवड झाल्याने त्यांची संधी हुकली होती. त्यावेळी हुलकावणी मिळालेले मानाचे पद आता ‘उपमहापौर’ रूपाने त्यांना मिळावे, असा त्यांच्या समर्थकांचा आग्रह आहे.

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला घाई, मग विमान अपघाताच्या चौकशीला विलंब का?; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल

नगरसेवकांना ‘मुंबईतच राहा’चे आदेश

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. या महत्त्वपूर्ण निवडणुकीच्या तोंडावर ‘फोडाफोडी’ टाळण्यासाठी आणि आपले संख्याबळ अबाधित राखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अत्यंत सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे.

१. नगरसेवकांना १५ फेब्रुवारीपर्यंत ‘मुंबई बंदी’

राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) या सर्वच प्रमुख पक्षांनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना निर्देश दिले आहेत. ११ फेब्रुवारीच्या मतदानापर्यंत आणि त्यानंतरच्या काही दिवसांसाठी (१५ फेब्रुवारीपर्यंत) कोणत्याही नगरसेवकाने मुंबईबाहेर जाऊ नये. ८ फेब्रुवारीला रविवार आणि ९ फेब्रुवारीला कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा आहे. या निमित्ताने अनेक नगरसेवक कोकणात जाण्याची शक्यता होती. मात्र, पक्षांनी त्यांना १० फेब्रुवारीपर्यंत अनिवार्यपणे मुंबईत हजर राहण्याचे कडक आदेश दिले आहेत.

२. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचे वेळापत्रक

७ फेब्रुवारी: महापौरपदासाठी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख.

११ फेब्रुवारी (दुपारी १२:०० वाजता): महानगरपालिकेच्या मुख्यालयात विशेष सभेचे आयोजन केले असून, याच दिवशी नव्या महापौर आणि उपमहापौरांची घोषणा होईल.

आरक्षण: यंदा मुंबईचे महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

३. महापालिकेतील पक्षीय बलाबल (२०२६ निकाल)
निवडणुकीनंतरचे चित्र पाहिले तर कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसले तरी महायुती (भाजप + शिंदे गट) बहुमताच्या जवळ आहे.

 

Web Title: Bmc mayoral election the names of trishna vishwasrao and yamini jadhav from the shinde group are being discussed for the post of mumbai deputy mayor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • BJP Politics
  • BMC Election 2026
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Satara News: दहिवडी नगरपंचायतीत सोनिया गोरेंची राजकीय मुत्सद्देगिरी; सर्व सभापती पदांच्या निवडी बिनविरोध
1

Satara News: दहिवडी नगरपंचायतीत सोनिया गोरेंची राजकीय मुत्सद्देगिरी; सर्व सभापती पदांच्या निवडी बिनविरोध

Elections 2026 : तामिळनाडू-बंगालमध्ये भाजपसमोर तगडे आव्हान; डाव्या पक्षांना देऊ शकणार का मात?
2

Elections 2026 : तामिळनाडू-बंगालमध्ये भाजपसमोर तगडे आव्हान; डाव्या पक्षांना देऊ शकणार का मात?

Pune Politics: पुणे महापालिकेत महायुतीत बिघाडी? आठवले गटाची भाजपवर उघड नाराजी
3

Pune Politics: पुणे महापालिकेत महायुतीत बिघाडी? आठवले गटाची भाजपवर उघड नाराजी

पाच राज्यांच्या निवडणुकांचा संपूर्ण देशावर परिणाम? सर्वच राजकीय पक्षांची ही ठरणार सत्वपरिक्षा
4

पाच राज्यांच्या निवडणुकांचा संपूर्ण देशावर परिणाम? सर्वच राजकीय पक्षांची ही ठरणार सत्वपरिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.