कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायतीत मात्र निकालांनी वेगळेच चित्र समोर आणले आहे. येथे राजर्षी शाहू विकास आघाडीने सहा जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे.
या निवडणुकांच्या निकालातून पुणे जिल्ह्यासह राज्यातील स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे स्पष्ट होणार असून, Maharashtra Municipal Council Election Result 2025 LIVE कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतमोजणीपूर्वी ईव्हीएम मशिन ठेवण्यात आलेला मुकेशभाई पटेल टाऊन हॉल येथील स्ट्राँग रूम उमेदवार व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत सकाळी साडेनऊ वाजता उघडण्यात आला.
मालवणमध्ये शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी ‘स्ट्रिंग ऑपरेशन’ करत भाजपचे पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याच्या वाहनातून रोकड जप्त केल्याची कारवाई केली.
नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल आता फुंकले गेले आहे आणि आता खऱ्या आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. पालघर मतदार यादीमधील गोंधळावरून आता राजकारण तापत चालल्याचे दिसून येत आहे