
पुणे: ‘पिअर्सन ग्लोबल इंग्लिश प्रोफिशियंसी’ने केलेल्या अहवालानुसार देशात दिल्ली 63च्या सरासरी गुणांसह इंग्रजी भाषा वापरण्यात आघाडीवर आहे. राजस्थान 60 गुणांसह दुसऱ्या तर पंजाब 58 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक ही शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेली राज्य इंग्रजी भाषा वापरण्यात 57 टक्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुधारकांनी इंग्रजी भाषेला ‘वाघिणीचे दूध’ असे संबोधले होते. इंग्रजी भाषेचे देशातील इतर भाषांवर प्रभुत्व वाढत आहे, अशी ओरड सगळीकडे होत असताना भारतीयांनी इंग्रजी बोलण्यात संपूर्ण जगाचा रेकॉर्ड मोडला आहे. भारतीयांचे इंग्रजी बोलण्याचे कौशल्य जागतिक सरासरीपेक्षा खूप चांगले आहे. इंग्रजी बोलण्याच्या क्षमतेमध्ये भारतीयांची सरासरी स्कोअर 57 आहे, जी जागतिक सरासरी 54 पेक्षा जास्त आहे, असा निष्कर्ष ‘पिअर्सन ग्लोबल इंग्लिश प्रोफिशियंसी’ या अहवालातून समोर आला आहे.
सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात भारत, फिलिपाइन्स, जपान, इजिप्त आणि युरोप सारख्या देशांमध्ये इंग्रजी कौशल्याच्या ट्रेंडचे विश्लेषण करण्यात आले आहे. या अहवालात अंदाजे 7 लाख 50 हजार लोकांच्या व्हर्सेंट टेस्ट (इंग्रजी बोलणे आणि ऐकण्याची चाचणी) डेटावर आधारित आहे.
PM Modi First Podcast : ‘माझ्याकडूनही चूका होतात…’, PM मोदी असं का म्हणाले?
व्हर्सन्ट हे इंग्रजी भाषेचे मूल्यमापन साधन आहे जे उमेदवारांच्या इंग्रजी भाषेच्या प्रवीणतेचे अचूक आणि कार्यक्षमतेने मूल्यांकन करते. या चाचणीमध्ये साधारणपणे वाचन,पुनरावृत्ती,लहान प्रश्न उत्तरे, वाक्य निर्मिती, कथा पुन्हा सांगणे आणि खुले प्रश्न अशा सहा चाचण्या असतात, ज्या इंग्रजी भाषेच्या क्षमतांचे अचूक मोजमाप करतात. कंपन्या या चाचण्यांचा वापर त्यांच्या गरजेनुसार योग्य इंग्रजी कौशल्य असलेले उमेदवार शोधण्यासाठी करतात.
Amruta Khanvilkar: नव्या वर्षात अमृताने केला नव्या घरात गृहप्रवेश, म्हणाली
इंग्रजी कौशल्यांमध्ये भारताचा सरासरी स्कोअर 52 आहे, जो जागतिक सरासरी (57) पेक्षा कमी आहे. तसेच इंग्रजी लेखनात 61 टक्के गुण घेत भारतीयांनी जागतिक सरासरीची बरोबरी केली आहे. तर फायनान्स आणि बँकिंग सेक्टरचा सर्वाधिक इंग्रजी बोलण्याचा स्कोअर 63 टक्के आहे जो जागतिक सरासरी 56 पेक्षा जास्त आहे. इंग्रजी भाषेच्या बाबतीत आरोग्य सेवा क्षेत्रात सर्वात कमी गुण (45) आहेत. तसेच टेक्नॉलॉजी, कन्सल्टिंग आणि बीपीओ इंग्रजी कौशल्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत.