(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर कायम सोशल मीडिया वरून तिच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातले खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत असते. आणि अशातच आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर नवीन वर्षात तिच्या नवीन घरी गृहप्रवेश केल्याचा खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने नवीन घर घेतल्याची बातमी प्रेक्षकांना दिली होती आणि आता तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. अमृताने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, “नव्या वर्षाची नवी सुरुवात गृहप्रवेशाने केला नव्या घराचा उंबरठा ओलांडला. स्वतःच्या हिमतीवर उभारलेल हे “एकम”.” असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे. “एकम” असे अभिनेत्रीच्या नव्या घराचे नाव आहे.
अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत. अभिनेत्रीने आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आज प्रदर्शित झालेल्या संगीत मानापमान चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून अभिनेत्री झळकणार आहे. 2025 वर्षाची उत्तम सुरुवात अमृताने केली आहे. तसेच वर्षभरात ती अनेक कलाकृती मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. अमृताने मुंबईत हे नवकोर घर घेतलं आहे 22 व्या मजल्यावर 2 बीएचके असलेलं हे घर अमृतासाठी नक्कीच या वर्षातील खास गोष्ट आहे.
अपघातानंतर उर्मिला कोठारेची पहिली पोस्ट, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
OTT Release: अखेर समजलेच! राम चरणचा ‘गेम चेंजर’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित!
नव्या घरात प्रवेश करताना अमृता खास तयार झाली होती. तिने लाल रंगाची नऊवारी साडी तसेच, नाकात नथ, पारंपरिक दागिने परिधान केले होते. ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि मोहक दिसत आहे. नव्या घरात गृहप्रवेश करताना अमृता खूप आनंदी दिसत आहे. तिचे कुटुंबीय देखील तिच्याबरोबर आनंदात होते. नव्या घरासाठी अमृताला अनेक कलाकारांबरोबर चाहत्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता याआधी घराबद्दल झाली व्यक्त
या खास क्षणाबद्दल बोलताना अमृता म्हणते “स्वप्नांच्या या शहरात घर विकत घेणं हे खरंच एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं वाटतंय. आज माझ्या वाढदिवसाच्या महिन्याच्या सुरुवातीला आणि लक्ष्मी पूजेच्या या शुभवेळेत मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या लक्ष्मीचं स्वागत करते “माझ्या गृहलक्ष्मी, माझ्या आईसह” नेहमीच मला एक असं स्वतःचं घर हवं होतं, जे माझ्या मेहनतीनं आणि प्रेमानं तयार झालेलं असावं. माझ्या कुटुंबासाठी, मित्र -मैत्रिणी आणि निर्वाण व नूर्वीसाठी. एक असं घर, जिथं आम्ही सगळे एकत्र येऊ शकतो, अनेक खास क्षण साजरे करू शकतो, आणि जीवनातील सुंदर क्षण अनुभवू शकतो.