महाविकास आघाडीकडून आज विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा 90+90+90 चा नवा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकडून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तरी महाविकास आघाडीत जागावाटपाचा रोज नवा फॉर्म्युला समोर येत आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत ८८-८५-८५ च्या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्यांच पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यातही १५ जागांचा घोळ संपला नव्हता. दरम्यान आज पुन्हा महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जात आहे. ९०-९०-९० या नव्या फॉर्म्युल्यानुसार निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीत काही जागांचा तिढा सुटत नव्हता. त्यामुळे जागावाटपाचा हा प्रश्न दिल्लीत पोहोचला होता. महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे नेते दिल्लीत ठाण मांडून होते. पक्षश्रेष्ठींसोबत जवळपास २ तास बैठक चालली. या बैठकीतही जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या जुन्या फॉर्म्युल्यानुसार १५ जागांचा घोळ कायम होता. या जागांची तिन्ही पक्षांमध्ये समान विभागणी झाली आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. आता या जागा कोणत्या आहेत आणि कोणाला मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
हे देखील वाचा-Maharashtra Election 2024 : नाहीतर २५ जागांवर निवडणूक लढवणार! महाविकास आघाडीला या पक्षाने दिला उद्या दुपारपर्यंतचा अल्टीमेटम
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून बुधवारी ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला होता. तर १८ जागां मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत. तरीही १५ जांगाचा घोळ काय होता. मित्रपक्षांसोबत आज बैठक होणार होती, म्हणजे त्या १८ जागांवरही अद्याप शिक्कामोर्तब नाही. मित्रपक्षासाठी सोडण्यात आलेल्या १८ आणि शिल्लक १५ जागा अशा एकून ३३ जागांबाबत महाविकास आघाडीत संभ्रम कायम होता. तसंच यातील १५ जागा कोण लढवणार हा कळीचा मुद्दा बनला होता. त्यावर कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या जागा समजूतीने बदलणार असल्याचं सांगितलं होतं.
महाविकास आघाडीचने ८५-८५-८५ चा फार्म्युला सांगितला होता. मात्र या फार्म्युल्यानुसार तिन्ही पक्षांच्या मिळून २५५ जागा होत होत्या तर मित्रपक्षांच्या १८ जागा, अशा एकून २७३ जागांचं गणित जुळतं होतं. मात्र विधानसभेच्या जागा २८८, त्यामुळे उरलेल्या १५ जागांचं काय? याबाबत राज्यभर तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. याबाबत महाविकास आघाडीत बैठकांचा धडाका सुरू आहे. कॉंग्रेसची आज दिल्लीतही बैठक पार पडली. या बैठकीतही जागावाटपाबाबत चर्चा करण्यात आली.
हे देखील वाचा-Sanjay Raut : ऐन निवडणुकीत संजय राऊत यांना मोठा दिलासा; 15 दिवसांची कोठडी स्थगित, नेमकं काय आहे प्रकरण?
कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ज्या १५ जागांचा घोळ होता, त्या तिन्ही पक्षांमधू वाटून घेतल्या जातील. त्यामुळे आता ९०+९०+९० च्या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याचं सांगितलं आहे. या जागा कोणत्या आहेत आणि या जागांवर कोण उमेदवार असणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.