महाराष्ट्रातील या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण, MIMIM, हिंदुत्व, लाडकी बहीण योजना, बंडखोरी, दलित फॅक्टर आणि भाजप हे सात मुद्दे प्रभाव पाटण्याची शक्यता आहे.
सोलापूर/शेखर गोतसुर्वे: राज्यात विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी अजूनही उमेदवार जाहीर झालेले नाहीत. तसेच अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांना संधी न मिळाल्याने बंडखोरी होण्याची शक्यता आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दक्षिण सोलापूरमध्ये विद्रोह होण्याची शक्यता आहे. दक्षिण सोलापूर मतदार संघात विद्रोहाचे पेव फुटले आहे. आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार दिलीप माने,अमर पाटील यांनी विद्रोह विरोधात ललकार दिला आहे. महादेव कोगनूरे मनसे,वंचीत बहूजन आघाडी संतोष पवार,अपक्ष श्रीशैलमामा हत्तूरे डोकी दुखी ठरणार आहे .
कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या दक्षिण सोलापूर मतदारसंघाला सुभाष देशमूख छेद देऊन सलग दोन वेळा विजयी भाजपाचा झेंडा फडकविला. माजी मंत्री कै. आनंदराव देवकते यांनी हा बाल्लेकिल्ला शाबूत ठेवला होता. देवकते यांच्या निधनानंतर हळूवारपणे काँग्रेसचा हा बाल्लेकिल्ला ढासळू लागला.माजी आमदार दिलीप माने यांनी हा किल्ला साबूत ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न २००९ साली केला होता. २०१४ साली सुभाष देशमूख यांनी या बालेकिल्ल्यावर भाजपाचा झेंडा त्यांनी फडकविला. तो विजयी झेंडा आज ही डौलाने फडकत आहे. भाजपचा विजयी वारू रोखण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीसमोर उभे आहे.
दक्षिणची जागा पारंपारिक पद्धतीने काँग्रेसला सुटेल असा कयास बांधण्यात येत होता. भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांच्यात तिरंगी लढत होत असताना मनसेचे उमेदवार महादेव कोगनुरे आणि वंचीतचे संतोष पवार यांनी ट्विस्ट निर्माण केला आहे. प्रस्थापिताविरोध विस्थापित असा नारा देत निवडणूक रिंगणात रंगत आणली आहे.
दक्षिण तालूक्यात लिंगायात, धनगर समाजाचे प्राबल्य आहे. सर्वच उमेदवारांकडून ही मते खेचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर भाजपकडून मतांची विभागणी होऊ नये, यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. दलित आणि मुस्लिम मते निर्णायक ठरणार आहेत.
हेही वाचा: विधानसभा निवडणुकीपूर्वीच ‘या’ बड्या पक्षाने दिला स्वबळावर लढण्याचा इशारा
आघाडीत दाेघांच्या उमेदवारीने पेच
शिवसेना ठाकरे गटाने माजी जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर केली. येथूनच महाविकास आघाडीत विद्रोहाची ठिणगी पेटली. माजी आमदार दिलीप माने यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बंडाचे निशान हाती घेतले. खासदार प्रणिती शिंदे यांच्या आश्वासनानंतर दिलीप माने यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीतून अमर पाटील आणि दिलीप माने या दोघाना उमेदवारी जाहीर झाल्यामूळे मोठा पेच निर्माण झाला आहे. दोघापैकी कोण उमेदवारी मागे घेणार की दाेघेही लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.
भाजपत श्रीशैल हत्तुरे यांचे बंड
भाजपाच्या गोटात नाराजीचा सूर उमटला आहे. सुभाष देशमुख विरोधात भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीशैल हत्तुरे यांनी बंड पुकारले आहे. देशमूख यांच्याकडून विकासकामे होत नसल्याचे कारण पुढे करित हत्तुरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यानी परिवर्तन घडविण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीशैलमामा हत्तुरे यांनी सोमवारी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
धर्मराज काडादींच्या भूमिकेकडे लक्ष
सिध्देश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांच्या भूमिकेकडे मतदारसंघातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत. कारखान्याची चिमणी पाडल्यापासून काडादी चर्चेत आले होते. भाजपविरोधात त्यांनी रणशिंग फुंकले होते. गावभेटी घेत त्यांनी विधानसभेची तयारी दर्शवली होती. खासदार शरद पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. काँगेसकडे मुलाखात न देता त्यांनी शरद पवार गटाकडे मुलाखात देऊन सर्वाना आचंबीत केले होते. दक्षिणची जागा शरद पवार गटाला सुटेल, असा अंदाज होता. मात्र तसे न होता महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाकडून अमर पाटील आणि काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काडादी समर्थक पुरते नाराज झाले आहेत. काडादी ठाकरे गट, काँगेसला पाठींबा देतात की, अपक्ष लढतात, हे पाहणे औचूक्याचे ठरणार आहे.