Photo Credit-Social Media
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यात समाजवादी पक्षाने 12 जागा मागितल्या आहेत. कमी करून 5 जागांपर्यंत वाटा खाली आणला तरीही महाविकास आघाडीकडून अजूनही या जागा दिल्या जात नसल्याने समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव चांगलेच संतापले आहेत. ‘लवकरात लवकर आम्हाला जागा द्या, अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे मैदानात उतरू’, असा इशाराच महाविकास आघाडीला दिला आहे.
हेदेखील वाचा : माहीम विधानसभा मतदारसंघात येणार रंगत; अमित ठाकरेंविरोधात भाजप देणार नाही उमेदवार? पण…
समाजवादी पक्षाने दावा केलेल्या पाच जागांपैकी महाआघाडीने 3 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. सपाने धुळे शहर, भिवंडी पूर्व, मानखुर्द, भिवंडी पश्चिम आणि मालेगाव मध्य या जागा मागितल्या होत्या. शिवसेना ठाकरे गटाने शनिवारी धुळे शहरातून अनिल कोते यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने मालेगाव मध्यमधून एजाज बेग आणि भिवंडी पश्चिममधून दयानंद मोतीराम यांना उमेदवारी दिली आहे.
अखिलेश यादव यांना इंडिया आघाडीअंतर्गत महाराष्ट्रात सपासाठी काही जागा हव्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत महाविकास आघाडीकडून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. राजकारणात बलिदानाला कुठेही स्थान नसते. तथापि, आधी आमचा प्रयत्न आघाडीत राहण्याचाच असेल, परंतु त्यांच्याकडूनच आम्हाला ठेवले जाणार नसेल तर जेथे आमच्या पक्षाची ताकद आहे.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे आहे मोठं अस्तित्त्व
समाजवादी पक्ष हा प्रामुख्याने उत्तर प्रदेशात असल्याचे पाहिला मिळत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी समाजवादी पक्ष नावाचा पक्ष हा भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक होता. समाजवादी पक्षाची स्थापना 4 ऑक्टोबर 1992 रोजी मुलायम सिंह यादव यांनी केली आणि ती उत्तर प्रदेशमध्ये आहे. समाजवादी पक्ष समतेच्या तत्त्वावर काम करणारा समाजवादी समाज निर्माण करण्यावर विश्वास ठेवतो.
महाविकास आघाडीत 85-85-85 जागांवर एकमत
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं 85-85-85 जागांवर एकमत झालं. 18 जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत. तरीही 15 जांगाचा घोळ होता. मित्रपक्षांसोबत बैठकही पार पडली. तरी अद्याप काही जागांवर शिक्कामोर्तब झालेले नाही. मित्रपक्षासाठी सोडण्यात आलेल्या 18 आणि शिल्लक 15 जागा अशा एकून 33 जागांबाबत महाविकास आघाडीत अद्यापही संभ्रम होता.
माहीममध्ये महायुतीत मतभेद?
सदा सरवणकर यांनी मैदानातून माघार घेण्यास नकार देत अमित ठाकरे यांच्या राजकीय क्षमता आणि मतदारसंघातील योगदानावर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, ‘कुणी मित्र म्हणून कर्तव्य बजावत असल्याने अमित ठाकरेंनी जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या मैत्रीची किंमत मी का चुकवावी?’ असेही त्यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : Baramati Assembly Election 2024: बारामतीचा आखाडा रंगणार; अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार मैदानात