मोठी बातमी! विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड; राम शिंदे म्हणाले...
Maharashtra Legislative Council Speaker: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. सध्या नागपूरमध्ये महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याच अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत होऊ शकते. सध्या विधानपरिषदेचे सभापतीपद 29 महिन्यांपासून रिक्त आहे. सध्या विधानपरिषदेचा कार्यभार उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे पाहत आहेत. मात्र आता विधानपरिषदेला सभापती मिळणार आहे. भाजप नेते राम शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.
दरम्यान भाजप नेते राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महायुतीने राम शिंदे यांचे नाव निश्चित केले आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही. दरम्यान महायुतीकडून राम शिंदे यांचे नाव निश्चित झाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान राम शिंदे हे विधानपरिषदेचे सभापती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
राम शिंदे प्रतिक्रिया देताना म्हणाले, “आमचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधानपरिषदेचा सभापती म्हणून माझी निवड केली. विधानपरिषदेचा सभापती बिनविरोध निवडून यावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. विरोधकांनी उमेदवार न देता माझ्या निवडीला पाठिंबा दिला आहे. याबद्दल महायुती आणि महावीकस आघाडीचे आभार मानतो. पक्षाला माझ्यावर विश्वास असल्याने त्यांनी मला ही जबाबदारी द्यायच ठरवले आहे. या संधीचे मी नक्की सोने करेन.
राहुल नार्वेकर यांची पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी निवड
दरम्यान विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. यानंतर यावर सभागृहाने एकमताने नार्वेकर यांच्या निवडीला संमती देण्यात आली. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी नार्वेकर यांचे स्वागत केले. राहुल नार्वेकर यांना मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षाच्या आसनाजवळ सन्मानानं नेलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नार्वेकर यांच्या आसनाजवळ जात अभिनंदन केले. राहुल नार्वेकर यांनी गेल्या पंचवार्षिकला शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीवर निकाल दिल्याने ते सर्वाधिक चर्चेत आहेत.
हेही वाचा : Rahul Narvekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष, एकमताने झाली निवड
राहुल नार्वेकर हे भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि देशातील कोणत्याही राज्याचे सभापती म्हणून निवडून आलेली दुसरी सर्वात तरुण व्यक्ती (वय 44) आहे. नार्वेकर यांची जून 2016 मध्ये राज्यपालांनी नामनिर्देशित सदस्य म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर निवड करण्यात आली होती.
यापूर्वी ते शिवसेना पक्षाचे सदस्य होते. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मावळ मतदारसंघातून पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली. अयशस्वी राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. राहुलचे वडील सुरेश नार्वेकर हे कुलाबा भागातील नगरपरिषद होते.