७ दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली नाही तर; काय सांगतात नियम अन् राज्यपाल कोणता निर्णय घेऊ शकतात? वाचा सविस्तर
महाराष्ट्रात राजकीय घडामोडींनी वातावरण तापलं असतानाच आज महायुतीचे नेते दिल्लीत पोहोचले. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची वेगळी बैठक, अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांची सुनिल तटकरेंच्या निवास्थानी वेगळी बैठक, अमित शहा-जेपी नड्डा यांची बैठक आणि त्यानंतर महायुतीचे हे तिन्ही नेते आणि अमित शहा, जेपी नड्डा यांची बैठक सुरू झाली. या चार हाय व्होल्टेज बैठकांनी सायंकाळी गारठलेल्या राजधानी दिल्लीचा पारा आज महाराष्ट्राच्या नेत्यांमुळे काहीसा वाढवला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
महाराष्ट्रातील महायुती सरकार स्थापनेसाठी दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर, दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरू आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाची घोषणा आणि खातेवाटपाचा निर्णय अपेक्षित आहे. महायुतीसह महाराष्ट्राची पुढील राजकीय दिशा ठरवणारी या बैठकीकडे पाहिले जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या आधी एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. एकीकडे फडणवीस-अजितदादा यांच्यात बैठक सुरू असतानाच दुसरीकडे शाहांंच्या निवासस्थानी जे पी नड्डा, अमित शाह यांच्या उपस्थितीत शिंदेंची बैठक पार पडली.