
चंद्रपुरात गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट; 12 झोपड्या आगीत जळून खाक
चंद्रपूर : चंद्रपुरात गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन दुर्घटना घडली. शहरातील राम सेतू परिसरात बालाजी मंदिराजवळील झोपडपट्ट्यांमध्ये आधी भीषण आग लागली. या आगीने झोपड्यांमध्ये ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात दहशत पसरली. ही घटना चंद्रपुरात घडली. फटाक्यांमधून निघणाऱ्या ठिणग्यांमुळे ही घटना घडल्याचा संशय आहे. या आगीत दोन डझनहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या.
दिवाळीच्या रात्री सर्वत्र फटाके पेटवले जात होते. दरम्यान, शहरातील दाताळा रोडवरील राम सेतूजवळ असलेल्या बालाजी मंदिराजवळील झोपडपट्टीवर फटाक्यांमधून निघालेल्या काही ठिणग्या पडल्या. सध्या परिसरात मोठे बांधकाम सुरू आहे. बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांनी जिजाऊ लॉनसमोरील शेतात त्यांच्या झोपड्या बांधल्या होत्या. या झोपडपट्टीतील झोपडपट्ट्यांच्या छतांना पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी ताडपत्रीने झाकण्यात आले होते. फटाक्यांच्या ठिणग्या या ताडपत्रीला लागल्याने काही सेकंदातच झोपड्यांना आग लागली.
हेदेखील वाचा : संभाजीनगरच्या वाळूजमधील फार्मा कंपनीत भीषण आग; कंपनीचा वरचा मजला जळून खाक
दरम्यान, या आगीने काही क्षणातच सर्व झोपड्यांना वेढून घेतले. आग इतकी तीव्र होती, आगीच्या ज्वाला २ किलोमीटर अंतरावरूनही दिसत होता. आगीचे स्फोट पाहून दाताळा गावातील काही लोक घटनास्थळी धावले. झोपड्यांमध्ये आग अजूनही सुरू असतानाच एका झोपडीत ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे आग आणखी भडकली. या घटनेची माहिती मिळातच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथे भीषण आग
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज येथे भीषण आग लागली. वाळूज औद्योगिक परिसरात गॅस कंपनी प्लँट शेजारी असलेल्या फार्मा कंपनीतील लॅबमध्ये सकाळच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली. लॅबमध्ये असलेल्या केमिकलमुळे आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण करत कंपनीचा वरचा मजला आपल्या विळख्यात घेतला.