Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका; ”मला माझ्याच देशात दहशतवादी…”,साध्वी प्रज्ञा यांची पहिली प्रतिक्रिया

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळाल्याबद्दल साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले आणि भावनिक विधान केले. त्या म्हणाल्या की, माझ्याच देशात मला दहशतवादी बनवण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 31, 2025 | 03:43 PM
मला माझ्याच देशात दहशतवादी...',साध्वी प्रज्ञा यांची पहिली प्रतिक्रिया (फोटो सौजन्य-X)

मला माझ्याच देशात दहशतवादी...',साध्वी प्रज्ञा यांची पहिली प्रतिक्रिया (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Malegaon blast case News in Marathi : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने सर्व सात आरोपींना निर्दोष सुटका करण्यात आली. यामध्ये भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर याही या प्रकरणात आरोपी होत्या. निर्दोष सुटल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी न्यायाधीशांना सांगितले की, “न्यायाचा आदर करण्यासाठी मी येथे आले आहे. मला १३ दिवस छळण्यात आले, माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. १७ वर्षे माझा अपमान करण्यात आला. माझ्याच देशात मला दहशतवादी बनवण्यात आले.” “मी सुरुवातीपासूनच म्हणत आले आहे की ज्याला चौकशीसाठी बोलावले जाते, त्याच्या मागे काहीतरी आधार असला पाहिजे. मला चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि अटक करण्यात आली आणि छळ करण्यात आला. यामुळे माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले, अशी प्रतिक्रिया प्रज्ञा ठाकूर यांनी दिली.

आश्रमशाळेतील पाण्याची टाकी कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू; तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी

भगव्याची बदनामी झाली

भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, “मी साध्वीचे जीवन जगत होते, पण मला फसवण्यात आले आणि आरोपी करण्यात आले आणि कोणीही स्वेच्छेने आमच्यासोबत उभे राहिले नाही. मी जिवंत आहे कारण मी संन्यासी आहे. त्यांनी कट रचून भगव्याची बदनामी केली.”

न्यायालयाने काय म्हटले?

विशेष एनआयए न्यायालयाने म्हटले आहे की, अभियोजन पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरला, आरोपी संशयाचा फायदा घेण्यास पात्र आहे.

मालेगाव शहर मुंबईपासून सुमारे २०० किमी अंतरावर आहे. येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मशिदीजवळ मोटारसायकलमध्ये ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झाला होता. १०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

गुरुवारी (३१ जुलै) निकाल वाचताना न्यायाधीशांनी सांगितले की, खटला संशयापलीकडे सिद्ध करण्यासाठी कोणतेही विश्वसनीय आणि ठोस पुरावे नाहीत.

न्यायालयाने म्हटले आहे की, “अभियोजन पक्षाने दावा केल्याप्रमाणे, स्फोटात वापरलेली मोटारसायकल ठाकूरच्या नावावर नोंदणीकृत होती हे सिद्ध झालेले नाही. मोटारसायकलवर ठेवलेल्या बॉम्बमुळे स्फोट झाला हे देखील सिद्ध झालेले नाही.” अशी प्रतिक्रिया प्रज्ञा ठाकूर यांनी दिली.

मालेगाव प्रकरणाची कालमर्यादा

२९ सप्टेंबर २००८: मालेगावमध्ये बॉम्बस्फोट, ६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

२००८ ऑक्टोबर: महाराष्ट्र एटीएसने तपास सुरू केला, साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह इतरांना अटक

२००९: तपास एनआयएकडे सोपवण्यात आला

२०११: एनआयएने पहिले आरोपपत्र दाखल केले.

२०१६: एनआयएने साध्वी प्रज्ञा आणि इतर ६ जणांविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल केले, पुराव्याअभावी मकोका रद्द केला

२०१७: सर्वोच्च न्यायालयाने कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर केला

२०१७: न्यायालयाने साध्वी प्रज्ञा यांनाही जामीन मंजूर केला

२०१८: मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने या प्रकरणात आरोप निश्चित केले

२०१९: साध्वी प्रज्ञा लोकसभा निवडणूक जिंकल्या, भोपाळमधून खासदार झाल्या

२०२३-२०२४: अनेक साक्षीदारांनी बडगा फिरवला, एटीएसकडून दबाव आल्याचा आरोप

३१ जुलै २०२५: सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

भोर तालुक्यातील वेळूत भीषण अपघात; दोन तरुणांचा मृत्यू, एकजण जखमी

Web Title: Malegaon blast case sadhvi pradnya thakur first reaction after nia court acquits all accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 12:54 PM

Topics:  

  • Malegaon
  • Malegaon blast case

संबंधित बातम्या

Malegaon Blast Case : अपर्णा पुरोहित यांनी सांगितल्या अनेक धक्कादायक गोष्टी
1

Malegaon Blast Case : अपर्णा पुरोहित यांनी सांगितल्या अनेक धक्कादायक गोष्टी

Malgeaon Bomb Blast: ‘मोदी-योगींचे नाव घ्या…’ साध्वीचे खळबळजनक खुलासे; तुरुंगातील अत्याचारावर केले भाष्य
2

Malgeaon Bomb Blast: ‘मोदी-योगींचे नाव घ्या…’ साध्वीचे खळबळजनक खुलासे; तुरुंगातील अत्याचारावर केले भाष्य

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल चर्चेत; न्यायव्यवस्थेची दिरंगाई अन् तपास यंत्रणेची अकार्यक्षमता आली समोर
3

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल चर्चेत; न्यायव्यवस्थेची दिरंगाई अन् तपास यंत्रणेची अकार्यक्षमता आली समोर

सैन्यातले सहकारी ब्रिगेडियर बनले, कर्नल पुरोहित यांचं काय? सैन्यात बढती मिळणार का?
4

सैन्यातले सहकारी ब्रिगेडियर बनले, कर्नल पुरोहित यांचं काय? सैन्यात बढती मिळणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.