Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malvan News: मालवणच्या विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा; आणखी ३० कोटींचा निधी आणणार – आ. निलेश राणे

नगरपालिका इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रसन्न आणि आनंदी वातावरण वाटले पाहिजे. यामुळे तळमजला आणि त्यापरिसरातील व्यवस्था ही दर्जेदार बनविली पाहिजे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 28, 2026 | 05:00 PM
Malvan News: मालवणच्या विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा; आणखी ३० कोटींचा निधी आणणार - आ. निलेश राणे

Malvan News: मालवणच्या विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा; आणखी ३० कोटींचा निधी आणणार - आ. निलेश राणे

Follow Us
Close
Follow Us:

Malvan News: स्वच्छ सुंदर मालवण शहर या संकल्पनेतून मालवण शहारासाठी जे जे काही करणे शक्य आहे ते सर्व काही केले जाईल. राज्य सरकार, अर्थसंकल्प तसेच नगर विकास खात्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात यश आले आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अजूनही निधी उपलब्धतेसाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही आ. निलेश राणे यांनी दिली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, स्वच्छता आरोग्य सभापती पुनम चव्हाण, महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, महेश कोयंडे, नगरसेविका शर्वरी पाटकर, मेघा सावंत, नीना मुंबरकर, भाग्यश्री मयेकर, महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर, ललित चव्हाण, मुख्याधिकारी, शिवसेना पदाधिकारी मंदार लुडबे, संग्राम साळसकर, राजू बिडये, बबन शिंदे, मोहन वराडकर, परशुराम पाटकर, शेखर गाड, जॉन नऱ्होना, निषय पालेकर, दया देसाई, सुशील शेडगे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘बल्क कन्झ्युमर’ मुळे मासेमाऱ्यांच्या डोक्याला ताप ? नेमकं ही संकल्पना आहे तरी काय ?

नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांना अभिप्रेत असलेला शहर विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे स्पष्ट केले. अधिवेशनात जनतेच्या हिताचे प्रश्न उपस्थित करून तसेच मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास निधी आमदार उपलब्ध करून देत आहेत. असेही नगराध्यक्षा यांनी सांगितले.

शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील

मालवण नगरपरिषद येथे आ. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. आ. राणे यांनी शासनाच्या माध्यमातून मंजूर करून आणलेल्या कोट्यावधी निधीतील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. मंजूर कामे, प्रगतीपथावर असलेली कामे, प्रस्तावित कामे अश्या सुमारे ९० ते १०० कोटी निधीतील विकास कामांचा आढावा घेण्यात आला. या विकास कामांसोबतच आणखीही २५ ते ३० कोटी विकास निधी मालवण शहरासाठी लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. राणे यांनी सांगितले. नगरपरिषद परिसराची पाहाणी करण्यात आली. मालवण नगरपरिषद नव्या सक्शन वाहनाचे लोकार्पण ही करण्यात आले.

नगरपालिकेचे प्रवेशद्वार आकर्षक बनवा
नगरपालिका इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रसन्न आणि आनंदी वातावरण वाटले पाहिजे. यामुळे तळमजला आणि त्यापरिसरातील व्यवस्था ही दर्जेदार बनविली पाहिजे. नगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांना याठिकाणी आल्यानंतर चांगल्या ठिकाणी आल्याचे समाधान वाटले पाहिजे. यामुळे प्रशासनाने प्रवेशद्वारावरील अडगळ आणि व्यवस्था सुस्थितीत करावी अशा सूचना आ. निलेश राणे यांनी दिल्या.

Mumbai Local: मध्य रेल्वेवरील गर्दी कमी होणार! आता ठाणे-डोंबिवली मार्गावरून धावणार 15 डब्यांची लोकल

घनकचरा व्यवस्थापन
शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी कचरा समस्या ही कायमस्वरूपी सुटण्यासाठी एक परिपूर्ण आराखडा बनविणे आवश्यक आहे. पालिकेने नवीन उपक्रम हाती घेण्यासाठी आणि त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करावेत निधी उपलब्ध करून दिला जाईल, पण शहर विकासासाठी सर्वांनी काम करावे असेही त्यांनी सांगितले.

शहरविकासासाठी मोठा निधी
नगरविकास खात्याकडून शहर विकासासाठी मोठा निधी निधी उपलब्ध झालेला आहे. यातून शहरातील रस्ते, गटार तसेच इतर प्राथमिक गरजा असलेली कामे प्राधान्यातून करताना प्रलंबित राहिलेले स्पोर्टस् कॉम्पेक्स आणि व्हिडीओ काढून चर्चेला आलेले नाट्यगृह ही कामे तातडीने पूर्ण केली गेली पाहिजे. स्पोर्टस् कॉम्पेक्ससाठी पाच कोटी रूपये खर्च करून सर्व काम पूर्ण करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मालवणातील मुलांना सुसज्ज स्पोर्टस् कॉम्पेक्स उपलब्ध होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नाट्यगृहामध्ये सर्व व्यवस्था पूर्ण करताना दर्जेदार नाट्यगृहाची निर्मिती होणे आवश्यक आहे.यासाठी तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेण्यात यावे,अशा सूचनाही राणे यांनी केल्या.

 

Web Title: Malvan infrastructure update mla nilesh rane promises additional 30 crore fund for city projects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • nilesh rane

संबंधित बातम्या

Nilesh Rane : आंबा-काजू शेतकऱ्यांना 22 हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई
1

Nilesh Rane : आंबा-काजू शेतकऱ्यांना 22 हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.