A young man was tortured with hot rods for going to a temple in Jalna.
जालना : राज्यामध्ये अत्याचाराच्या रोज नवीन घटना समोर येत आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याचे धक्कादायक असे फोटो देखील समोर आले असून यामुळे राज्यभरामध्ये रोष व्यक्त केला आहे. याचप्रमाणे आता जालनामधील अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.
शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ जालनामधील असल्याचा दावा केला जातो आहे. यामध्ये एका तरुणावरुन काही लोकांकडून अमानूष अत्याचार होत असल्याचे दिसत आहे. कैलास बोराडे असे या तरुणाचे नाव असल्याचे समोर येत आहे. तळपत्या सळईचे चटके हे पीडित तरुणाला दिले जात आहे. तरुणाच्या उघड्या अंगावर हे जळत्या सळईचे चटके दिले जात आहेत. तापलेल्या रॉडने कैलासच्या पायाला, पोटाला, पाठीला, मानेवर,गळ्याजवळ, दंडावर, डाव्या तळहातावरचटके देत संशयितांनी जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. जालन्याचे पोलिस प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून आरोपीला अटक झाली आहे. तसेच आरोपीवर 307 चा गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनांमुळे माणसांमधील माणूसकी हरवली असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या या गंभीर घटनांमुळे राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. हा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्येने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिलेले असतानाच आता लातूरच्या जानेफळ गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोऱ्हाडे या तरूणाची कातडी सोलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोखंडाच्या तप्त सळईने त्याच्या शरीरावर डागण्या देण्यात आल्या; कारण काय तर तो मंदिरात गेला !
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गेल्या महिनाभरापूर्वी लातूरमध्येच माऊली सोट यालाही अशाच पद्धतीने संपविण्यात आले होते. शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घेत असताना एका गोरगरीब मागासवर्गीय समाजातील तरुणाची केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून गरम सळईचे चटके देऊन पाठ सोलली जात असेल अन् त्याची कातडी सोलली जात असेल तर आपणाला खरंच शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? कालच मी संतोष देशमुखचे फोटो आधीच सरकारकडे असल्याचे नमूद करून सरकारचा उल्लेख “निर्दयी” असा केला होता. आता महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या घटनेची साधी वाच्यताही केली जात नसेल तर मी उल्लेख केलेला निर्दयी हा शब्द किती योग्य आहे, याची प्रचिती येते. केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून जर असे हालहाल करून मारले जात असेल तर या गोरगरीब, दलित समाजातील तरूणांनी कायदा हातात घेतला तर त्यास फक्त हे सरकार जबाबदार असेल! असा घणाघात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिलेले असतानाच आता लातूरच्या जानेफळ गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोऱ्हाडे या तरूणाची कातडी सोलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोखंडाच्या तप्त सळईने त्याच्या शरीरावर डागण्या देण्यात आल्या; कारण काय… pic.twitter.com/bSUVT74d9W
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 5, 2025