Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manda Mhatre: ‘माझा गणेश नाईकांशी वैयक्तिक वाद नाही….’ आमदार मंदा म्हात्रेंचं विधान

Navi Mumbai News: माझा गणेश नाईकांशी कोणताही वैयक्तिक वाद नाही, असं विधान आमदार मंदा म्हात्रे यांनी केलं आहे. गणेश नाईक हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते माझ्या आधीपासून राजकारणात आले आहेत, असं देखील म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 16, 2025 | 09:01 AM
Manda Mhatre: 'माझा गणेश नाईकांशी वैयक्तिक वाद नाही....' आमदार मंदा म्हात्रेंचं विधान

Manda Mhatre: 'माझा गणेश नाईकांशी वैयक्तिक वाद नाही....' आमदार मंदा म्हात्रेंचं विधान

Follow Us
Close
Follow Us:

सिद्धेश प्रधान

नवी मुंबई : डॉ. राजेश पाटील यांना जिल्हाध्यक्ष पद दिल्यावर मला मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष बांवनकुळे यांनी माहिती दिली. मी तातडीने राजेश पाटलांना फोन केला. त्यांना सांगितले की, आधी गणेश नाईकांना भेटा , त्यांचे मार्गदर्शन घ्या. ते मंत्री आहेत. मग आपण भेटू. गणेश नाईक हे ज्येष्ठ नेते आहेत. माझे आणि त्यांचे थेट वाद अजिबात नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे आमच्यात वाद होत आहेत, असं विधान आमदार मंदा म्हात्रे यांनी केलं आहे. जुईनगर येथील डॉ. राजेश पाटील यांच्या पदग्रहण सभेत त्या बोलत होत्या. आमदार मंदा म्हात्रे यांनी केलेल्या या विधानामुळे आता पुन्हा नवा पेच निर्माण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचं कारण म्हणजे आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्यांबाबत मोठं विधान केलं आहे.

Devendra Fadnavis: महाराष्ट्रात ५,१२७ कोटींची थेट परकीय गुंतवणूक होणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी केला करार

जुईनगर येथील डॉ. राजेश पाटील यांच्या पदग्रहण सभेत बोलत असताना आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितलं केला आहे की,  माझा गणेश नाईकांशी वैयक्तिक वाद नाही. माझे आणि त्यांचे थेट वाद अजिबात नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे आमच्यात वाद होत आहेत. हे कार्यकर्ते त्यांचे काम भरत असतात.

आमदार मंदा म्हात्रे पुढे म्हणाल्या की, गणेश नाईक हे माझ्या आधीपासून राजकारणात आले आहेत. ते मंत्री राहिलेले आहेत. त्यानंतर मी राजकारणात आलेली आहे. त्यांच्यासोबत मी काम केलेले आहे. खांद्याला खांदा लावत पक्ष उभारणीसाठी झटले आहे. १९९९ साली त्यांच्या निवडणुकीसाठी मी त्यांच्या प्रचारासाठी रात्रीचा दिवस केलेला आहे. मी त्यांना नेताच मानते. मात्र कार्यकर्त्यांना वाटते की, मी त्यांना नेते मानत नाही. नेते हे नेतेच असतात. मी महापौर निवडणूक देखील लढलेली होती. राज्यात अनेक पदे भूषविलेली आहेत. ३५ वर्षांचा दांडगा अनुभव माझ्याकडे आहे.

Pune Local Body Elections: निवडणुकांपूर्वी पुणे, पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये नव्या नियुक्त्या; धीरज घाटे आणि शत्रुघ्न काटेंना जबाबदारी

यावेळी बोलताना मंदा म्हात्रे यांनी संदिप नाईक यांच्याविषयी भाष्य केले. त्या म्हणाल्या की, माजी अध्यक्षांच्या काळात देखील त्यांना सहकार्य करण्याची भूमिका होती. त्यांनी जिल्हा कार्यकारिणीत त्यांची माणसे नियुक्त केली. तरीही आम्ही सहकार्य केले. अपक्षाने दिलेले कार्यक्रम राबवले. माजी अध्यक्षांना मी सांगितले होते, की तुम्ही पक्षांतर करू नका. आपण तरुण आहात आपल्याला या पक्षात भविष्य आहे. मात्र त्यांनी ऐकले नाही असे म्हणत मंदा म्हात्रे यांनी संदिप नाईकांबद्दल गौप्यस्फोट केला.

Web Title: Manda mhatre said she dont have any personal argument with ganesh naik politics news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 08:56 AM

Topics:  

  • Maharashtra Poitics
  • MLA Manda Mhatre
  • Poltical News

संबंधित बातम्या

Navi Mumbai : नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे वाद पुन्हा उफाळला !
1

Navi Mumbai : नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे वाद पुन्हा उफाळला !

Navi Mumbai : मंदा म्हात्रे यांच्या निधीतून ज्वेल ऑफ नवी मुंबईत बुद्ध पुतळा उभारला
2

Navi Mumbai : मंदा म्हात्रे यांच्या निधीतून ज्वेल ऑफ नवी मुंबईत बुद्ध पुतळा उभारला

Manda Mhatre : केमिकल कंपनीवर तातडीने कारवाई करावी, आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी
3

Manda Mhatre : केमिकल कंपनीवर तातडीने कारवाई करावी, आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.