Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोरांना मुंबईतून बाहेर काढणाऱ्या स्वच्छता अभियानाची गरज- मंत्री मंगल प्रभात लोढा

कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचा केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईमधील घुसलेले रोहिंग्या आणि बाग्लादेशी घुसखोरांना बाहेर काढले पाहिजे असा पवित्रा घेतला.

  • By नारायण परब
Updated On: Oct 03, 2024 | 09:09 PM
रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोरांना मुंबईतून बाहेर काढणाऱ्या स्वच्छता अभियानाची गरज- मंत्री मंगल प्रभात लोढा
Follow Us
Close
Follow Us:

केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते आज कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय येथील आयटीआयचे नामकरण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई असे करण्यात आले. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते गोरेगाव, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती व नागपूर येथील संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनीचा शुभारंभ करण्यात आला.

देशातील एकमेव कौशल्य विद्यापीठ

कार्यक्रमात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री चौधरी म्हणाले की, “आजचा क्षण ऐतिहासिक आहे, कारण आपल्या सर्वांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या वास्तूत शिक्षण घेतले, त्या वास्तूला त्यांचेच नाव देण्याचा समारंभ आणि ज्या व्यक्तीने आयुष्यभर स्वच्छतेचे महत्व पटवून दिले त्या संत गाडगेबाबा महाराज यांच्या नावाने सहा ॲकडमी सुरू करण्यात आल्या आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या दोन्ही महापुरूषांचे विचार आपल्या युवा पिढीने आत्मसात करून आपल्या देशाला तिसरी आर्थिक महासत्ता बनण्यासाठी, कौशल्यपूर्ण विकास करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने कौशल्य विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केले असून हे देशातील एकमेव कौशल्य विद्यापीठ आहे, ज्यामध्ये कौशल्ययुक्त शिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जात आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब असून, राज्याच्या कौशल्य विकास विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून हे कौतुकास्पद आहे.”

मुंबईमध्ये घुसलेले रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोर बाहेर काढायला हवेत

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना  मंत्री लोढा म्हणाले, “भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करणे ही केवळ सन्मानाची गोष्ट नाही, तर त्यांचा आदर्श घेऊन आम्ही हजारो तरुणांना स्वावलंबी बनवण्याचे काम करत आहोत. त्यासोबतच आज संत गाडगे बाबांच्या नावाने आम्ही स्वच्छ भारत प्रबोधिनीची सुरुवात केली आहे. त्याकाळी स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी संत गाडगे बाबांनी हातात झाडू घेतला आणि स्वच्छता अभियान सुरू केले. ज्याप्रमाणे संत गाडगे बाबांनी त्याकाळी महाराष्ट्रातला कचरा बाहेर काढला, त्याचप्रमाणे आज मुंबईमध्ये घुसलेले रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोर बाहेर काढायला हवेत.”

राज्यात विविध ठिकाणी सुरु होणार  संत गाडगे बाबा स्वच्छ भारत प्रबोधिनी

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून भारतात प्रथमच ठाण्यात संत गाडगे बाबा स्वच्छ भारत प्रबोधिनीची सुरुवात झाली. या प्रबोधिनीला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन आता गोरेगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती व नागपूर येथे देखील सदर प्रबोधिनी सुरू होत आहेत. ठाणे येथे या प्रबोधिनीच्या प्राथमिक बॅचेस पूर्ण झाल्या असून, आता भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध झालेल्या आहेत.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक संस्था

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातील १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय येथे आयटीआय मुंबईचे नामकरण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक संस्था मुंबई-१ असे करण्यात आले आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी २६ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण होणार असल्याचे देखील सांगितले होते.

आज झालेल्या कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अनिल कुमार, राष्ट्रीय लोकदलचे महासचिव के पी चौधरी, माजी लोकसभा सदस्य मलुक नागर, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, कौशल्य विकास आयुक्त प्रदिप डांगे, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.

संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनीचे प्रतिनिधी असलेल्या मुंबईच्या दिप्ती जाधव, पुण्याचे सुरज महाजन, छत्रपती संभाजीनगरचे सागर भारती, नाशिकचे प्रमोद दुंगी, नागपूरचे प्रदीप काटकर, अमरावतीचे प्रफुल्ल भुसारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Web Title: Mangal prabhat lodha said that need for cleanliness drive to evict rohingya and bangladeshi infiltrators from mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 09:00 PM

Topics:  

  • Bangladeshi Muslim
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
1

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर
2

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?
3

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड; मानधनातही वाढ
4

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड; मानधनातही वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.