जरांगे पाटील यांचे इटक वॉरंट रद्द
पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागील अनेक महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चेत आले आहे. आरक्षणासाठी त्यांनी उपोषण व आंदोलनं केली आहेत. मात्र नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोपांवर जरांगे पाटील यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. आता मात्र त्यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
नाट्य मिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. 2013 साली जालन्यात धनंजय घोरपडे यांच्या शंभूराजे नाटकाचे 6 प्रयोगांचा आयोजन करण्यात आलं होतं. मनोज जरांगे, अर्जुन जाधव आणि दत्ता बहीर यांनी हे आयोजन केलं होतं. प्रत्येक प्रयोगाला 5 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये देण्याच आयोजकांनी कबूल केल्याच घोरपडेंचा दावा आहे. हे प्रकरण पुणे न्यायालयामध्ये सुरु असून जरांगे पाटील यांनी सुनावणी वेळी हजेरी लावली नव्हती. कोर्टात हजर न राहिल्यामुळे जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. आज मनोज जरांगे पाटील पुणे सत्र न्यायालयात हजर झाले. यावेळी पुणे कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. त्याचसोबत समज देखील दिली आहे. कोर्टाचा अवमान होईल अशा पद्धतीची वक्तव्य टाळावीत अशा समज आपणास देत आहोत असं कोर्टाने म्हटलं आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात प्रथम न्यायदंडाधिकारी ए.सी.बिराजदार यांनी हे अटक वॉरंट काढले होते. सरकारी वकिलांनी हे अटक वॉरंट रद्द करण्यास विरोध केला. मात्र कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांचं अटक वॉरंट रद्द केले आहे. तसेच जरांगे पाटील यांना नव्याने बंद पत्र कोर्टाला द्यायला सांगितलं आहे. त्याशिवाय आजमीनपात्र अटक वॉरंट रद्द होणार नाही.