Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेवासामधून मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले भुजबळांना शांत करा अन्यथा मराठा शांत करायला सक्षम

Manoj Jarange : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचे राज्यभर दौरे सुरू आहेत. तत्पूर्वी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांची शाब्दीक चकमक पाहायला मिळाली. येवल्यात गावबंदीचे होर्डिंग फाडण्यात आल्याचे आरोप करीत जरांगे यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावरूनच सरकारला त्यांनी इशारा दिला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 23, 2023 | 03:05 PM
Manoj Jarange

Manoj Jarange

Follow Us
Close
Follow Us:

नेवासा/अहमदनगर : महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) आपल्या प्रत्येक सभेतून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर निशाणा साधताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, येवल्यात गावबंदीचे होर्डिंग फाडण्यात आल्याचे आरोप करत जरांगे यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोबतच, भुजबळांना शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम असल्याचा इशारादेखील दिला आहे.

अन्यथा आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल

यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “मराठ्यांना आरक्षण म्हंटले की विरोध चालू झाला. अनेकजण मराठा खेकड्यासारखा असल्याचे म्हणायचे, पण आता करोडो बांधव एकत्र आले आहे. ही लाट आता थांबणार नाही. तो म्हातारा कसंही बरळत आहे. आपण कोणाचं नाव घेत नाही, त्याची लायकीदेखील नाही की आपण त्याचं नाव घ्यावेत. सर्वांचं खातो आणि म्हणतो मी खात नाही. येवल्यात आमचे बोर्ड फाडले असे कळते, अजित दादाला सांगतो त्याला समजावून सांगा. अन्यथा आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल, नाहीतर आमच्या नावाने खडे फोडू नका.

नाही तर मग आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही सांगतो. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर आमचे बोर्ड फाडले असतील, तर मग आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल. तुम्हाला हे जड जाईल आधीच सांगतो. चिल्लर चाळे करू नको म्हणून त्याला सांगत आहे. सरकारला देखील हे जड जाऊ शकते, गंभीर्याने घ्या, सरकारला त्रास होईल. येवल्यात मराठा बांधवांचे गावबंदीचे बोर्ड फाडल्यावरून जरांगे यांनी सरकारला ईशारा दिला आहे.

आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करू नका
याला (भुजबळ) दोन-तीन दिवसांत शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम आहेत. फडणवीस यांनी त्याला समज द्यावी, आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करू नका. तसेच, मराठ्यांना आवाहन आहे, आरक्षणाची अशी संधी परत येणार नाही. त्यामुळे सध्या शांत रहा, आम्हाला आरक्षण येऊ द्या मग पाहतो हा कुठे पळतो. आता होर्डिंग फाडल्याचे व्हडिओ काढून ठेवा. नंतर बघू हा एकाच गल्लीत आहे, असे जरांगे म्हणाले.

नाहीतर आमचाही नाईलाज होईल
पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, “मी शांत बसलो की, हा (भुजबळ) सुरू करतो. गोरगरिबांचा तळतळाट लागल्याने जेलमध्ये गेला. राज्य पुन्हा दुषित करण्याचे काम यांनी केले आहे. खायची किती हौस आहे. सरकारला आवाहन करतोय आणि अजित दादांना सांगतोय. हा माणूस जातीय तेढ निर्माण करतोय. याला रोखा, कार्यकर्त्यांना होर्डिंग फाडायला लावत आहे. आता मी शांत बसणार नाही, कारण मी गद्दार नाही. मराठा तुम्हाला शांत करायला सज्ज झाले आहेत. तुम्हीच त्याला पाठिंबा देताय का?, शेवटची विनंती सरकारला करतो. नाहीतर आमचाही नाईलाज होईल,” असेही जरांगे म्हणाले.

अधिवेशनाचे दिवस वाढवले…
24 तारखेपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गी निघणार आहे. मराठा तरुणांनी दिलेलं बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही. 7 ते 22 डिसेंबरपर्यंत अधिवेशन आहे. मात्र, आता 29 पर्यंत तारीख पुढे गेल्याचे कळत आहे. बहुतेक आपल्या मुद्द्यासाठीच आणखी तारीख वाढवली आहे, असेही जरांगे म्हणाले.

Web Title: Manoj jarangs warning to government they said pacify the bhujbals otherwise capable of pacifying maratha nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2023 | 03:05 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • Minister Chhagan Bhujbal

संबंधित बातम्या

Manoj Jarange Murder Conspiracy: मनोज जरांगे हत्येच्या कटप्रकरणात मोठी अपडेट; धनंजय मुंडेचा समर्थकाला अटक
1

Manoj Jarange Murder Conspiracy: मनोज जरांगे हत्येच्या कटप्रकरणात मोठी अपडेट; धनंजय मुंडेचा समर्थकाला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.