दर्शन रांगेतील मंडप ठेकेदाराकडे मागितले पैसे; CM दौऱ्यानंतर अधिकाऱ्याला पाठवलं घरी पाठवला घरी
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात लाखो भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनासाठीच्या रांगा भले मोठ्या असल्या, तरी यंदा प्रशासनाच्या उत्तम व्यवस्थापनामुळे दर्शन सुरळीत आणि लवकर होत होते. मात्र, या धार्मिक उत्सवातच आता आर्थिक गैरप्रकाराचा आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
Astrology: ऑगस्ट महिन्यात लक्ष्मी नारायण आणि गजलक्ष्मी योगामुळे या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना दर्शन रांगेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपाच्या ठेकेदाराकडून पैसे घेतल्याच्या आरोपांमुळे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरात दर्शन घेतल्यावर काही तासांतच ही कारवाई झाल्यामुळे याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
मंदिर समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. श्रोत्री यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. वारीदरम्यान मंडप आणि बॅरिकेड्स उभारणीसाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदाराशी त्यांनी कथितपणे आर्थिक व्यवहार केल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या.
मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितले की, चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली असून, ती आठ दिवसांत अहवाल सादर करणार आहे. दरम्यान, मंदिर समितीच्या गोशाळेत एका वासराचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातही चौकशी सुरू असून, संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासे मागवण्यात आले आहेत. दोषींवर कारवाई केली जाईल, असे औसेकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आजच पंढरपूरमध्ये एक अभिनव उपक्रम सुरू झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व्हर्च्युअल रिअॅलिटी गॉगलच्या माध्यमातून महापूजेचा अनुभव घेण्याची सेवा सुरू करण्यात आली. ‘व्हर्च्युअल वर्ल्ड’ कंपनीने मंदिराचा 3D चित्रीकरण करून हा उपक्रम साकारला आहे. यामुळे गॉगल घालून भाविकांना देवमूर्तीसमोर उभं असल्याचा सजीव अनुभव घेता येणार आहे.
Vastu Tips: एखाद्याला घड्याळ भेट देणे योग्य आहे का? काय आहे यामागील वास्तू नियम
देशातील उज्जैन आणि काशी नंतर महाराष्ट्रात पंढरपूर हे तिसरे ठिकाण आहे जिथे हा तंत्रज्ञानाधारित उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.