Manoj Jarange has finally decided to contest Maharashtra elections 2024
जालना : राज्यामध्ये विधानसभा निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. मागील दीड वर्षांपासून राज्यामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार आंदोलन केले. मात्र महायुती सरकारने आचारसंहिता लागेपर्यंत याबाबत जरांगे पाटील यांना अपेक्षित असा निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणाच्या आख्याड्यात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा समाजाची निवडणूकीमध्ये उमेदवार उभे करायचे की नाही याबाबत बैठक घेतली. जालन्यामध्ये मराठा समाजाला बोलावून उमेदवार उभे करायचे की उमेदवार पाडायचे असा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुकांसोबत भेटी घेतल्या. तयारीचा आढावा घेत जरांगे पाटील यांनी अर्जदारांसोबत संवाद साधला. त्यानंतर आता विधानसभेमध्ये उतरायचे की नाही हे ठरवले जाणार आहे.
यासाठी महाराष्ट्रामधील मराठा समाजातील लोक अंतरवलीमध्ये जमा झाले आहेत. यावेळी हात वर करुन जरांगे पाटील यांनी निवडणुकीमध्ये उतरायचे की नाही असा प्रश्न विचारला. यावेळी मराठा समाजाकडून उमेदवार उभे करायचे यासाठी अनेकांनी हात वर केले. यामुळे मराठा समाजाची निवडणुकीमध्ये उतरण्याची इच्छा असल्याचे दिसून आले. यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला निवडणूकीमध्ये उभे राहण्याचे फायदे तोटे यांची माहिती दिली.
हे देखील वाचा : राज ठाकरेंच्या मन वळवणीचे प्रयत्न सुरु; भाजपचे केंद्रीय मंत्री घेणार भेट
यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, “माझी निवडणूकीकडे किंवा राजकारण्यामध्ये जाण्याची इच्छा नाही. माझी वैयक्तिक इच्छा नाही. पण मी समाजाच्या पुढे नाही. आपण राजकारणामध्ये राहू नये असं मला वाटतं. पण या निवडणुकीमुळं माझ्या समाजाचा लढा या नादामध्ये बंद पडला नाही पाहिजे, ही जबाबदारी तुमची. निवडणूकीमध्ये हार किंवा जिंकण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर समाज खचला नाही पाहिजे. गांभीर्याने विचार करा,” असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी महायुती व महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला. जरांगे पाटील म्हणाले की, “महाविकास आघाडी व महायुती हे सख्खे मावस भाऊ आहेत. ज्याला कोणाला पाडावं वाटतो आणि ज्याला कोणाला उभं राहावं वाटतं तो हे सख्खे भाऊ आहेत. यामध्ये मी सावत्र भाऊ सापडलो आहे. आपण उभे केले तर भाजपवाले खुष होतील. नाही उभा केले तर महाविकास आघाडीवाले म्हणतील आमचे सगळे येतील. आणि दोघं पण म्हणत नाहीत की आम्ही आरक्षण देऊ,” असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : पुण्यात मुख्यमंत्र्यांचा लांबलचक ताफा; वसंत मोरे भडकून म्हणाले,’आयोग झोपा काढतोय?
निवडणूकीला उभे राहण्याची केली घोषणा
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचे मत घेत निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. जरांगे पाटील म्हणाले की, तुम्ही अर्ज भरा. 29 तारखेला सांगू कोणाचा अर्ज मागे घ्यायचा. जिथे आपल्या विचारांचा उमेदवार असेल त्यांना पाठिंबा द्यायचा. समीकरण जुळलं नाही तर निवडणुकीतून माघार घ्यायची. मी सांगेन तेव्हा त्या मतदारसंघातून अर्ज मागे घ्यायचा. नाही घेतला तर मी तिसऱ्याला पाडा असं सांगेन, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.