बीड हत्या प्रकरणाती आरोपींना कोण वाचवतंय?, मनोज जरांगेंनी थेट नावच सांगितलं
परभणीत काही दिवसांपूर्वी हिंसाचार घडला होता. त्यात पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. तर बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. त्यात अनेकांवर आरोप केले जात आहेत. दरम्यान यातील आरोपींना वाचवलं जात असल्याचाही आरोप होतं आहे. त्यावर आज मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Kazakhstan Plane Crash : कझाकीस्तानमध्ये विमान कोसळून ४२ प्रवाशांचा मृत्यू ; भयावह Video आला समोर
मनोज जरांगे पाटील यांनी आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत मृत्यू होऊन आणि संतोष देशमुख यांची हत्या होऊन इतके दिवस झाले तरी आरोपींना शिक्षा झाली नाही. आरोपींची नावे कुटुंबियांनी सांगितली तरी सुद्धा सरकार कारवाई करत नाही. या कुटुंबांना न्याय मिळणार नाही का हे सकराने स्पष्ट करावं, आणि जर आरोंना शोधलं नाही तर आम्ही एकालाही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सूर्यवंशी आणि देशमुख प्रकरणातील आरोपींना कोण वाचवतत आहे, असा सवाल पत्रकारांनी जरागेंना केला, त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी, सरकारलाच जबाबदार धरलं आहे. तसंच या प्रकरणात मंत्री, अधिकारी किंवा राजकीय संबंध असलेली कोणतीही व्यक्ती असू देत, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सरकारने तातडीने अॅक्शन घेतली पाहिजे. कोणी कोणाला फोन केला. कोणाला सोडायला लावलं हे समोर आलं आहे.
Almatti Dam: अलमट्टी धरण उंचीवाढीच्या विरोधात शेतकरी-नागरिक आक्रमक; कर्नाटक सरकारचा पुतळा जाळला
मुख्यमंत्र्यांना आम्ही पुन्हा पुन्हा विनंत करत आहेत की त्या सर्वांना कोठडीत टाका. २८ तारखेला मोर्चा आहे. त्यात कोणतंही राजकारण नाही. सर्वांनी त्यात सहभागी व्ह, असं आवाहन त्यांनी केलं. परभणीच्या घटनेवरही बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. अतिशय निर्घुन पद्धतीने ही हत्या करण्यात आली होती. अपहरण करून तीन तास मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या जखमा पाटीवर आणि संपूर्ण अंगावर होत्या. हत्येनंतर आरोपी फरार झाले होते. या हत्येनंतर एकच खळबळ माजली होती. त्याची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे. तर परभणीत बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर एकच हिंसाचार उडाला होता. या दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांनी पोलिसांनी अटक केली होती. मात्र पोलीस ठाण्यात त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. दोन्ही प्रकरणांचे विधीमंडळाच्या अधिवेशनात पडसाद उमटले होते. त्यानंतरही हे प्रकरण थांबताना दिसत नाही, आज मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.