Photo Credit- Social Media Almatti Dam: अलमट्टी धरण उंचीवाढीच्या विरोधात शेतकरी-नागरिक आक्रमक; कर्नाटक सरकारचा पुतळा जाळला
कुरुंदवाड : अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा निषेधार्थ कुर्डूवाडी पालिका चौकात शेतकरी नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन कर्नाटक सरकारचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारला अलमट्टी धरण उंची वाढीला त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे.
कुरुंदवाड पालिका चौकात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता एकत्रित येऊन कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. कर्नाटक सरकारचा पुतळा दहन करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी पुतळा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आंदोलन आणि पोलिसांच्या यावरून झटापट झाली.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगली, कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील अनेक भागात आणि शेतीत महापुराचे पाणी तुंबून राहणार आहे. या पाण्याचा विसर्ग व्हायला दीड ते दोन महिने लागणार आहेत. यामुळे कृषी बरोबरच आर्थिक हानी मोठी होणार आहे. यामुळे शिरोळ तालुक्याचे मोठे नुकसान होणार आहे. कर्नाटक सरकारने हा निर्णय रद्द करावा केंद्र सरकारने या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक उदय डांगे म्हणाले, ‘मे महिन्यात कर्नाटकात पाणी नसल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडे कर्नाटक सरकारने पाण्याची मागणी केली होती कर्नाटक सरकारला पाणी देऊन महाराष्ट्र सरकारने पुण्य कमावले होते. याची उतराई उंची वाढवून कर्नाटक सरकार करत आहे का,’ असा रोखठोक सवाल केला.
लहान मुलांमध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे हे आहे 4 मोठे संकेत
महाराष्ट्रात पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी महापुराच्या घटना घडतात. त्यातीलच पश्चिम महराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना देखील महापुराचा फटका बसतो. पश्चिम महाराष्ट्रात जी महापूरची स्थिति निर्माण होते त्याला कर्नाटक सरकार जबाबदार असल्याचे म्हटले जाते. म्हणजेच कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरला पुराचा फटका बसतो असे आरोप केले जातात. सध्या या धरणाची ऊंची 519 मीटर इतकी आहे. मात्र आता कर्नाटक सरकारने या धरणाची ऊंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सांगली-कोल्हापूरवर महापूरचे संकट वाढण्याची शक्यता आहे.
अलमट्टी धरणाची ऊंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. धरणाची ऊंची 5 मीटरने वाढवण्यासाठी ही परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यास सांगली-कोल्हापूरला पुराचा धोका वाढणार आहे. मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला की सांगली-कोल्हापूरला पुराचा धोका निर्माण होतो.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्याच्या स्थापनेपासूनच तिन्ही राज्यांत कृष्ण नदीच्या पाण्यावरून वाद असल्याचे पाहीला मिळाले. हा वाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडून 1969 मध्ये कृष्णा पाणी तंटा लवादाची स्थापन करण्यात आली. ज्यानुसार तिन्ही राज्यांना अनुक्रमे 585 टीएमसी, 731 टीएमसी आणि 811 टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले. पाणी अडवण्यासाठी तिन्ही राज्याना धरणे आणि कालवे बांधण्यासाठी सांगण्यात आले.
Almatti Dam: कर्नाटकच्या ‘या’ मागणीमुळे सांगली-कोल्हापूरला महापुराचा धोका वाढला? जाणून घ्या सविस्तर
कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाची ऊंची 5 मीटरने वाढवायची आहे. असे करून त्यांना शेती सिंचनाखाली आणायची आहे. त्यासाठी केंद्रीय लवादाने कर्नाटकला धरणाची ऊंची 5 मीटरने वाढवण्यास परवानगी दिली आहे. जर का ही ऊंची वाढवण्याची परवानगी मिळाली तर सांगली कोल्हापूरमध्ये महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात वधू शकतो.
सांगली-कोल्हापूर शहराला वारंवार महापुराचा फटका बसतो. 2005,2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या महापुराला यासाठी कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी धरण जबाबदार असल्याचा आरोप होतो. अलमट्टी धरणातून पानी न सोडण्यात आल्याने कृष्णा नदीच्या पाण्याचा फुगवटा वाढून सांगली कोल्हापूरमध्ये पुरस्थिती निर्माण होत असल्याचे महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे. कृष्णा नदी महाराष्ट्रसाठी तसेच सांगली-कोल्हापूरसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र हीच कृष्णा माई अनेकदा कोपल्याचे पाहायला मिळते. कर्नाटक सरकारला धरणाची ऊंची वाढवण्याची परवानगी मिळाली तर या दोन जिल्ह्यांना महापुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र हे रोखणीसाठी आता महाराष्ट्र सरकार कोणती पावले उचलणार हे पहावे लागणार आहे.