Kazakhstan Plane Crash
कझाकीस्तानमध्ये आज भीषण विमान दुर्घटना घडली. यात ४२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अकाटू शहरानजीक ही दुर्घटना घडली. त्याचा भयावह व्हिडिओही समोर आला आहे. समुद्रकिनाऱ्यालगत विमान कोसळल्यानंतर स्फोट झाला आहे. कझाकीस्तान सरकारच्या हवाल्याने AP ने हे वृत्त दिलं आहे.
Another angle of the plane crash in Aktau, Kazakhstan pic.twitter.com/x7ECIcmxgZ
— RT (@RT_com) December 25, 2024
BNO News has shared another, extremely horrific video of the Azerbaijan Airlines Flight 8243 crash in Kazakhstan’s Aktau.#Kazakhstan #Aktau #PlaneCrash #Azerbaijan https://t.co/6fvK0FkuFy pic.twitter.com/cep56WaGYU
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) December 25, 2024
कझाकिस्तानच्या अकाटू येथील समुद्र किनाऱ्याच्या जवळ हे विमान क्रॅश झालं. स्फोटाचा व्हिडीओही समोर आला आहे. या विमानात १०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगसाठी सूचना केली होती. मात्र त्यानंतर लगेचच हे विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. अजरबाईजन एअरलाईनचं हे विमान होतं.
अजरबाईजन एअर लाईन्सने दिलेल्या माहितीनुसार, J2-8243 या विमानाचं बाकू पासून ग्रॉन्जी हवाई मार्गावर तातडीने या विमानाचं लँडिंग करावं लागलं. अकाटूपासून तीन किमी अंतरावर लँडिंग करत असतानाच विमान दुर्घटनाग्रस्त झालं. TASS या रशियन न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान मखाचाकलाच्या दिशेने वळवण्यात आलं होतं. विमानाचा अपघात झाल्यानंतर सदर ठिकाणी ५२ फायरफायटर्स आणि ११ बचावपथकं तैनात करण्यात आली आहेत ज्यांच्याकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अजरबैजान एयरलाईन्सच्या विमानाने रशियाच्या चेचन्या येथील बाकूमधून ग्रोज्नीसाठी उड्डाण भरलं होतं. ग्रोज्नीमध्ये मोठ्या प्रमाणात धुकं असल्यामुळे विमानाने आपला मार्ग बदलला. विमान धावपट्टीच्या अगदी जवळ असताना त्याचा व्हिडिओ शूट करत करण्यात आला. हे विमान उतरत असताना अचानक थेट जमिनीकडे येताना हे विमान दिसत आहे. धावपट्टीवर येण्यापूर्वीच हे विमान जमिनीवर आदळलं त्यावेळी मोठा आवाज झाला. विमानातील प्रवासीही किंचाळत असल्याचा आवाजही व्हायरल व्हिडीओत येत आहे. विमान कोसळल्यावर त्याला आग लागली. एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर या अपघाताचे अनेक व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत.
काही वृत्तसंस्थांनी विमानाचा अपघात हा दाट धुक्यांमुळे झाला आहे आणि इमर्जन्सी लँडिंग करताना विमान कोसळल्याचं म्हटलं आहे. तर काही वृत्तसंस्थांनी विमानाच्या मार्गात पक्षी आल्याने हा अपघात घडला असं म्हटलं आहे. मात्र अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या अपघातात जे लोक जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.