Maratha Manoj Jarange Patil marches to Mumbai August 29 Maratha reservation
जालना : मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वी त्यांनी दीड वर्षे याच मुद्द्यावरुन रान पेटवले होते. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसह सर्वव्यापी आंदोलन उभे केले. आता पुन्हा एकदा राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा तापणार आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आंदोलनासाठी नवीन तारीख दिली आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे आगेकूच करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे जालनातील अंतरवली सराटी येथून मुंबईकडे रवाना होणार आहे. आरक्षणाच्या आंदोलनाबाबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना होणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यामुळे आता राज्य सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. तसेच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारकडं मराठा बांधवांनी समजून घ्या कारणच येत नाही. आता आपल्याला त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही, आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही. मुद्दाम सांगत नाही आणि समाजाला माहिती मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या हिताचा उचलतो. योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतोय. 28 ऑगस्टला मी उपोषण करणार तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बास,” अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण जाहीर केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पंढरपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला आहे. हाके म्हणाले की, “काल परवा, संदीपान भुमरे, उदय सामंत हे मनोज जरांगे पाटील यांना कशाला भेटायला गेले होते. या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची घोषणा कशी केली. अशा प्रश्नांची उत्तरे फडणवीस यांनी द्यावी अन्यथा ज्या दिवशी शिंदे समितीचा अहवाल सरकार स्वीकारेल. त्याच्या दुसऱ्या दिवशी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी राज्यभर आंदोलन उभा केले जाईल. वेळप्रसंगी मंत्र्याच्या घरासमोर बसून आंदोलन करू,” असा संशय लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे.