नातेपुते येथे माऊलींच्या पालखीचे परतीच्या प्रवासात उत्साहात स्वागत
नातेपुते : गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत असलेला आषाढी पायी वारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर असा तर देशाच्या विविध भागांतून अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला आषाढी वारीसाठी येतात. पंढरपूरला आषाढी एकादशीला येणाऱ्या सर्व संतांच्या पालखी गोपाळ कालानंतर आपापल्या मार्गाने जात असतात. आळंदी ते पंढरपूरला व परत पंढरपूरपासून आळंदीला नेण्यात येते.
दरवर्षीप्रमाणे बेंदूर सण झाल्यावर व गोपाळकाला झाला की सर्व संतांच्या पालख्या आपापल्या गावी परतीच्या प्रवासाला निघतात. त्याप्रमाणे काल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका सजवलेल्या रथातून आळंदीला परतीच्या प्रवासाला निघाले असताना शनिवारी सांयकाळी साडे पाच वाजता नातेपुते येथे मोठ्या उत्साहात या पालखी सोहळ्याचे स्वागत नातेपुते नगरपंचायतचे वतीने तसेच डॉ. बा. ज. दाते प्रशालेच्या वतीने व नातेपुते पोलीस स्टेशन वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक नागरिक महिला व लहान अबालवध्द जमले होते.
आळंदीला जाण्यासाठी आल्यानंतर सर्व जण आनंदी झाले व माऊलींच्या नामघोष चालू झाला. सर्व जण फुले उधळून व श्रद्धापूर्वक नमस्कार करून माऊलींच्या स्वागत व निरोप देताना अनेका़चे डोळे पाणावले होते. माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी याचा आनंद सर्वाच्या चेहऱ्यावर दिसून येते होता. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. नातेपुते करासाठी हा दिवस म्हणजे साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा या संतांच्या उक्तीप्रमाणे आनंद घेण्यात आला.
अनेक प्रकारच्या दुकाने खरेदीसाठी महिलांची गर्दी केली होती. लहान मुलांसाठी लहान पाळणे खेळणी लावण्यात आली होती. तर महिलांच्या प्रंचंड प्रतिसाद खरेदी करताना दिसत होता. दर्शनासाठी लांब रांगा लागल्या होत्या. नातेपुते पोलिस स्टेशनचे अधिकारी महारूद परजणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.