
measles
मुंबई : कोरोनाप्रमाणे आता गोवरही (Measles) राज्यात वेगाने पसरण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला मुंबईमध्ये गोवरचे रुग्ण आढळल्यानंतर आता राज्यभरात रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या तुलनेत कोरोनापेक्षा पाच पट वेगानं गोवर पसरत असल्याच समोर आलं आहे. गोवरचा सर्वाधिक धोका नवजात बालकांपासून 5 वर्ष वयाच्या मुलांना आहे. साथ पसरू नये, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
[read_also content=”नवले पुलावर 10 दिवसांतच दुसरा अपघात, चार जण जखमी https://www.navarashtra.com/maharashtra/second-accident-in-10-days-on-navale-bridge-four-injured-349642.html”]
गेल्या काही दिवसापासून मुंबईत गोवरची (Measles) साथ पसरली आहे. हळूहळू मुंबईसह संपूर्ण राज्यात आता गोवरची साथ पसरण्यास सुरुवात झाली आहे. लहान मुलांना गोवरचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून लहान मुलांची काळजी घेण्याच आवाहन करण्यात येत आहे. मंगळवारी गोवरमुळे 5 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. आता मोठ्या व्यक्तींमध्येही गोवरचं प्रमाण दिसून आले आहे. मुंबईसह राज्यात नागपूरपाठोपाठ आता नाशिक, अकोल्यातही गोवरचा शिरकाव झाला आहे. काही रुग्णांमध्ये गोवरची लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने मुंबईत तपासणीसाठी पाठवले आहेत. कोरोनापेक्षा गोवर वाढण्याचा वाढीचा वेग जास्त असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई आणि ठाणे येथे गोवर सेंटर उभारण्यात आली आहेत.
गोवरचा सर्वाधिक संसर्ग हा लहान मुलांना होत आहे. त्यामुळे लहान मुलांची योग्य काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.