Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी ‘पीसीएमसी’ने लढवली नवी शक्कल; देशातील पहिलीच महापालिका ठरली, जाणून घ्या नेमकं केलं तरी काय?

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मालमत्ता कराचे आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2023 | 06:35 PM
थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी ‘पीसीएमसी’ने लढवली नवी शक्कल; देशातील पहिलीच महापालिका ठरली, जाणून घ्या नेमकं केलं तरी काय?
Follow Us
Follow Us:

पिंपरी चिंचवड : सध्या झपाट्याने लोकप्रिय झालेल्या मीमने (Meme) तरुणाईवर गारुड केले आहे. एखाद्या व्यवसायापासून ते चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी मीमचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतोय. हसत-खेळत, चिमटे काढत व्यक्तीच्या वर्मावर बोट ठेवणाऱ्या या मीमचा वापर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) कर आकारणी व कर संकलन विभागाने थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसूल करण्यासाठी सुरू केला आहे.

सोशल मीडिया युजर्ससाठी कर संकलन विभागाने ‘#मी_थकबाकीदार’ या मीम स्पर्धेचे आयोजन केले असून, तिला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. मराठी मीम मॉक्स यांच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या या भन्नाट उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा केवळ पिंपरी चिंचवड शहरासाठी मर्यादित न राहता आता पुण्यासह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही सुरू झाली आहे. मीम स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांवरून ते दिसून येत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मालमत्ता कराचे आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. वारंवार आवाहन करूनही मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यातच कर संकलन विभागाने आता थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मीम स्पर्धा आयोजित करून एक अनोखा उपक्रमही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केला आहे. या उपक्रमाचे सोशल मीडिया युजर्सकडून कौतुक करण्यात येत आहे.

सोशल मीडियावरील बहुतांश युजर्स या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. अतिशय कल्पनात्मक मीम बनवत #मी_थकबाकीदार स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमाची चर्चा आता केवळ सोशल मीडियापुरतीच मर्यादित न राहता, सर्वसामान्य नागरिकांमध्येही सुरू झाली आहे.

देशातील पहिली महानगरपालिका

मालमत्ता कर वसुलीसाठी मीम स्पर्धेसारखा अनोखा उपक्रम राबवणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील पहिली महापालिका असल्याची चर्चाही सोशल मीडियावर आहे. आतापर्यंत कर वसुलीसाठी विविध महानगरपालिकांनी थकबाकीदारांच्या दारामध्ये जाऊन ढोल वाजवण्यासारखे उपक्रम केले आहेत. परंतु या पारंपारिक गोष्टींपासून थोडासा वेगळा उपक्रम मीम स्पर्धेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबवला आहे. त्यामुळे या उपक्रमाला प्रतिसादही चांगला मिळत आहे.

Web Title: Meme introduced by pcmc over pending tax issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2023 | 06:34 PM

Topics:  

  • Marathi News
  • PCMC . Pune . Pimpri . Chinchwad
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.