Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता आरे JVLR ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत मिळणार नेटवर्क कनेक्टिव्हिटी, प्रवास होईल अधिकच सुखकर

सध्या मुंबईच्या पोटात तसेच उपनगरीय भागात मेट्रोचे जाळे राज्य सरकारकडून पसरवले जात आहे. यावेळी नेटवर्क कनेक्टिव्हिटीवर सुद्धा लक्ष केंद्रित केले जात आहे. आता मुंबईतील आरे JVLR ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत प्रवाशांना नेटवर्क कनेक्टिव्हिटीची सुविधा वापरता येणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 06, 2024 | 09:35 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

सध्या मुंबईच्या रस्त्यावरून जाताना आपल्याला अनेक ठिकाणी मेट्रोचे बांधकाम पाहायला मिळते. कुठे तरी मेट्रोसाठी खडे पाडले जात आहेत तर कुठे रस्ता बंद केला जात आहे. मुंबईतल्या काही भागात तर ही मेट्रो सेवा चालू सुद्धा झाली आहे. एकंदरीत या मेट्रो सेवेमुळे मुंबईतील कनेक्टिव्हिटी वाढली आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) द्वारे आरे JVLR ते वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानकापर्यंत प्रवाशांना नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मेट्रो-३ चा प्रवास सुखकर बनविण्यासाठी तिकीट खिडक्या तसेच कॉन्कोर्सजवळ ही सेवा प्रवाशांना उपलब्ध असेल. वायफाय सेवेमुळे त्यांना तिकीट खरेदी करणे सुलभ होणार आहे. सध्या ही सेवा तिकीट खिडक्या व कन्कोर्स जवळ उपलब्ध असली तरी भविष्यात प्लॅटफॉर्म आणि भुयारात देखील वायफायचा उपयोग प्रवाशांना करता येणार आहे.

हे देखील वाचा: निवडणुकीआधी महायुतीमधील प्रहार पक्षाला बसणार ‘कडू’ धक्का; ‘हा’ आमदार शिवसेनेत प्रवेश करणार?

प्रवासी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन, तिकीट काउंटर, तिकीट वेंडिंग मशीन आणि एमएमआरसी वेबसाइटवरून सिंगल आणि रिटर्न प्रवासाची तिकिटे खरेदी करू शकतात. येण्या-जाण्याच्या प्रवासासाठी तिकिटे ३ तास वैध राहतील. स्थानकांमध्ये तिकीट खरेदी करणारे प्रवाशी त्यांचे तिकीट कोणत्याही अडचणीशिवाय बुक करण्यासाठी उपलब्ध मोबाईल आणि वायफाय नेटवर्क वापरू शकतात.

हे देखील वाचा: चेंबूरच्या सिद्धार्थंनगरमधील आग दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांची आर्थिक मदत

MMRC लवकरच सर्व स्थानकांवर आणि ट्रेनच्या आत वेगवेगळ्या सेवा प्रदात्यांकडून उत्तम 4G आणि 5G मोबाइल नेटवर्क कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणार आहे. तसेच तुम्ही https://play.google.com/store/apps/details?id=com.metroconnect3.app या लिंकवरून मेट्रो ३ चे मोबाइल अ‍ॅप MetroConnect3 डाउनलोड करू शकता.

तसेच ज्यांच्याकडे आयफोन असेल त्यांनी https://apps.apple.com/us/app/metroconnect3/id6723876321 या लिंकवरून हे अ‍ॅप डाउनलोड करू शकता. तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही https://mmrcl.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

Web Title: Metro 3 passengers from aarey jvlr to bkc will get network connectivity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 09:32 PM

Topics:  

  • metro 3
  • Mumbai Metro

संबंधित बातम्या

Thane News : सत्ताधाऱ्यांची मेट्रोच्या नावाने निवडणुकीची चाचपणी; जनहित याचिका दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा
1

Thane News : सत्ताधाऱ्यांची मेट्रोच्या नावाने निवडणुकीची चाचपणी; जनहित याचिका दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा

Metro 3 चे बांधकाम पूर्ण, सीएसएमटी, चर्चगेट, मंत्रालयही जोडलं जाणार, कुठून आणि कसा असेल मार्ग?
2

Metro 3 चे बांधकाम पूर्ण, सीएसएमटी, चर्चगेट, मंत्रालयही जोडलं जाणार, कुठून आणि कसा असेल मार्ग?

Ganesh Chaturthi 2025: आता उशिरापर्यंत करा गणेश दर्शन! मुंबई मेट्रो धावणार मध्यरात्रीपर्यंत, ‘या’ मार्गावरील सेवा वाढवली
3

Ganesh Chaturthi 2025: आता उशिरापर्यंत करा गणेश दर्शन! मुंबई मेट्रो धावणार मध्यरात्रीपर्यंत, ‘या’ मार्गावरील सेवा वाढवली

Thane News : वाहतूक कोंडीवर रुंदीकरण पर्याय नव्हे तर…; घोडबंदर रस्त्याच्या रुंदीकरणास नागरिकांचा विरोध
4

Thane News : वाहतूक कोंडीवर रुंदीकरण पर्याय नव्हे तर…; घोडबंदर रस्त्याच्या रुंदीकरणास नागरिकांचा विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.