Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबो! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहे म्हशींचं गाव, मतदारांपेक्षा जास्त आहे म्हशींची संख्या

हतनुर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये खामखेडा गावातील नागरिकांची शेतजमीन गेली. त्यामुळे या गावातील नागरिकांना उदरनिर्वाहासाठी पर्याय नव्हता. त्यामुळे खामखेडा गावातील नागरिक दुध उत्पादनाकडे वळले. या गावची लोकसंख्या बाराशे आहे. या लोकसंख्येपेक्षा जास्त म्हशी या गावामध्ये पाळल्या जातात.

  • By साधना
Updated On: Apr 11, 2023 | 06:04 PM
buffallow village khamkheda

buffallow village khamkheda

Follow Us
Close
Follow Us:

जळगाव: ग्रामीण भागात अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाचा धंदा करतात. दूग्ध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो. जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यात एक गाव असं आहे जिथे गावात मतदारांची संख्येपेक्षा गायी आणि म्हशींची (Buffalo Village) संख्या जास्त आहे. या गावाचं संपूर्ण अर्थकारण दुधाच्या व्यवसायावर अवलंबून आहे. या गावातून दररोज किमान 1 हजार 600 लिटर दूध इतरत्र पाठविले जाते. हे गाव आहे मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा (Khamkheda). हे गाव मुक्ताईनगर शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे.(Milk Producing Village)

[read_also content=”यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ठरणार खास, आकाशातील ताऱ्याला महामानवाचं नाव https://www.navarashtra.com/maharashtra/dr-babasaheb-ambedkars-name-to-be-given-to-the-star-registry-process-done-nrsr-383244.html”]

हतनुर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये या गावातील नागरिकांची शेतजमीन गेली. त्यामुळे या गावातील नागरिकांना उदरनिर्वाहासाठी पर्याय नव्हता. त्यामुळे खामखेडा गावातील नागरिक दुध उत्पादनाकडे वळले. या गावची लोकसंख्या बाराशे आहे. या लोकसंख्येपेक्षा जास्त म्हशी या गावामध्ये पाळल्या जातात. या गावातील प्रत्येक कुटुंबाकडे साधारण वीस ते पंचवीस म्हशी आहेत. एक म्हैस दररोज दहा ते बारा लिटर दूध देते. या दुधाच्या उत्पादनातून गावातील नागरिकांचा उदरनिर्वाह चालतो. गायी-म्हशींसोबतच कोंबड्यादेखील या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. या दुधाची विक्री मुक्ताईनगर तालुक्यात, जळगाव जिल्ह्यात व परराज्यातही केली जाते.

माणसांपेक्षा जास्त म्हशींची संख्या
2011 च्या जनगणनेच्या वेळी खामखेडा गावाची लोकसंख्या 1540 होती. त्यापैकी 1030 मतदार आहेत. यातही गावातील अनेक तरुण नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी आहेत. ते तरुण व लोक गावात आहेत ते दुग्ध व्यवसायाशी निगडीत आहेत. 2019च्या पशुगणनेनुसार गावात तब्बल 823 म्हशी व 296 गायींची नोंद आहे. मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात त्यापेक्षा जास्त पशूधन आहे. गेल्या सहा दशकांपासून या गावाने दूध उत्पादक गाव आणि म्हशींचं गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या गावात एक सहकारी व एक खासगी दूध डेअरी असून काही तरुण मुक्ताईनगर शहरात घरोघरी जावून दूध विक्री देखील करतात.

दुधाची गुणवत्ता चांगली
या गावातील दूध उत्पादक शेतकरी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घेतात. गायी, म्हशींच्या आहाराकडेही विशेष लक्ष दिले जात असल्याने खामखेडा गावातील दुधाची गुणवत्ता खूपच चांगली मानली जाते. यामुळे अनेकजण खामखेडा गावातून येणार्‍या दूधाला पहिली पसंती देतात. येथील तरुणाईनेही दूध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करण्याचा मार्ग निवडला आहे, जो इतरांना प्रेरणादायी ठरत आहे. जळगाव जिल्ह्यात 5 लाख 77 हजार 302 गायी व 2 लाख 69 हजार 105 म्हशी आहेत. मात्र यापैकी केवळ 1 लाख 52 हजार 439 गायी व 1 लाख 53 हजार 930 म्हशी पैसासक्षम आहेत. यातून होणार्‍या दूध उत्पादनात खामखेडा गावाचा मोठा वाटा आहे. खामखेडा गावाची कहाणी निश्चितच अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आणि अनेक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे.

Web Title: Milk producing village khamkheda is known as buffalo village nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2023 | 03:59 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
1

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
2

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर
3

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली
4

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.