Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

सातारा जिल्ह्यात ऊस बिलाच्या व्याजासाठी किसान काँग्रेस आक्रमक. वसीम इनामदार यांनी साखर आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिला इशारा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 03, 2026 | 03:21 PM
कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार!

कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार!

Follow Us
Follow Us:

 

  • कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार!
  • जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
​सातारा दि ३ ( प्रतिनिधी ): “शेतकरी हा कारखानदारांच्या दावणीला बांधलेला गुलाम नाही. ऊस देऊन दोन महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या घरात अन्नाचा घास नाही आणि कारखानदारांच्या तिजोऱ्या मात्र ओसंडून वाहत आहेत. कायदा सांगतो १४ दिवसांत पैसे द्या, पण हे कारखानदार कायद्याला जुमानत नाहीत. आता संयम सुटला आहे; शेतकऱ्यांचा ऊस व्याजासहित मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. हा केवळ इशारा नाही, तर हक्काच्या पैशांसाठी पुकारलेला एल्गार आहे!” अशा जळजळीत शब्दांत सातारा जिल्हा किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री. वसीम मकबुल इनामदार यांनी कारखानदारांना ठणकावून सांगितले. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी व किसान काँग्रेसच्या वतीने आज साखर आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात अंतिम इशारा देणारे निवेदन सादर करण्यात आले.

आक्रमक मागण्या आणि प्रशासनावर प्रहार

​१५% व्याजाचा हक्क सोडणार नाही: ‘शुगरकेन कंट्रोल ऑर्डर १९६६’ मधील तरतुदीनुसार, विलंब झाल्यास १५% व्याज देणे अनिवार्य आहे. केवळ मूळ रक्कम देऊन शेतकऱ्यांची बोळवण खपवून घेतली जाणार नाही. व्याजाचा एक-एक पैसा मिळेपर्यंत लढा सुरूच राहील. ​प्रशासनाची भूमिका संशयास्पद: सर्वसामान्य माणसाने बँकेचे कर्ज थकवले की जप्ती आणणारे प्रशासन, कोट्यवधी रुपये थकवणाऱ्या कारखानदारांसमोर नतमस्तक का होते? नियम फक्त शेतकऱ्यांसाठीच आहेत का? असा रोकठोक सवाल इनामदार यांनी केला.

Wai News: पाचगणीत ‘सफाई मित्रांचा’ गौरव! नगरपरिषद आणि हिलदारीतर्फे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

​वजनकाट्यातील चोरी आणि बेकायदेशीर कपात

कारखान्यांच्या वजनकाट्यात होणारी अफरातफर आणि बिलातून केली जाणारी अनधिकृत कपात ही शेतकऱ्यांची उघड लूट आहे. ही लूट तात्काळ थांबवा, अन्यथा कारखान्यांच्या गेटला कुलूप ठोकण्यास आम्ही मागे-पुढे पाहणार नाही.

​’जनसुनावणी’ नंतर आता ‘जनआंदोलन’

​काँग्रेस पक्षाने राबवलेल्या ‘जनसुनावणी’ उपक्रमातून शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश समोर आला आहे. बियाणे, खते आणि मजुरीसाठी शेतकऱ्यांनी काढलेली कर्जे व्याजाने वाढत आहेत, मग कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे विनाव्याज का वापरावेत? ​”शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाण्याचे रूपांतर आता कारखानदारांविरुद्धच्या अंगारात झाले आहे. सातारा जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याची पिळवणूक होऊ देणार नाही. जर तात्काळ व्याजासह बिले मिळाली नाहीत, तर सातारा जिल्हा काँग्रेस स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल. याद राखा, शेतकऱ्याचा ऊस आता व्याजाशिवाय सुटणार नाही!” असे सातारा जिल्हा किसान काँग्रेस कार्याध्यक्ष, वसीम मकबुल इनामदार यांनी म्हटले आहे.

Unseasonal Rain In Maharashtra: आता काही खरं नाही…! राज्यात ‘या’ दिवशी वादळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

Web Title: The kisan congress will launch a fierce protest against the arbitrary actions of factory owners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार
1

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
2

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Satara: सातारच्या अकरा वर्षाच्या लेकराची कमाल; दोन दिवसात कलावंतीण, प्रबळगड केले सर
3

Satara: सातारच्या अकरा वर्षाच्या लेकराची कमाल; दोन दिवसात कलावंतीण, प्रबळगड केले सर

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
4

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.