Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आता मराठा समाज मोकळेपणाने…”; मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयावर भुजबळांची सूचक प्रतिक्रिया

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांची यादी न आल्यामुळे मनोज जरांगे यांनी माघार घेतली आहे. एकाच जातीवर निवडणूक कसं लढवणार,एकाच जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 04, 2024 | 02:45 PM
"आता मराठा समाज मोकळेपणाने..."; मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयावर भुजबळांची सूचक प्रतिक्रिया

"आता मराठा समाज मोकळेपणाने..."; मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयावर भुजबळांची सूचक प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे परिणाम राज्यातील लोकसभा निवडणुकीत दिसले आले. मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतच काही ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. मात्र आता निवडणूक लढवणार नाही, पण उमेदवारी पाडणार असे म्हणत जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. सोमवारी (4 नोव्हेंबर) सकाळी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. त्यावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतल्यानंतर छगन भुजबळ नेमके काय म्हणाले आहेत, ते पाहुयात.

मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील संघर्ष सर्वांना माहितीच आहे. मात्र निवडणुकीतून माघार घेतल्यावर भुजबळ यांनी जरांगे पाटील यांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतला आहे, त्याचे मी स्वागत करतो. एका समाजावर निवडणूक लढवणे शक्य नसते. आता मराठा समाज मोकळेपणाने निवडणुकीत भाग घेऊ शकतो. सर्वच पक्षाने जे उमेदवार दिले आहेत, त्यात ५० त ६० टक्के मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांचा निर्णय अत्यंत योग्य आहे, असे भुजबळ म्हणाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांची यादी न आल्यामुळे मनोज जरांगे यांनी माघार घेतली आहे. एकाच जातीवर निवडणूक कसं लढवणार,एकाच जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढवायची नाही. मराठा समाजातील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत. एकानेही अर्ज कायम ठेवू नये, असे आवाहन मनोज जरंगे यांनी केले आहे.

काल समाजबांधवाशी  मतदारसंघावर सविस्तर चर्चा झाली. पहाटे तीन-चार वाजेपर्यंत ही चर्चा सुरू होती. मित्रपक्षांची यादी अजून आलेली नाही. एका जातीवर निवडून येणं कसं शक्य आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. याला पाड,त्याला पाड म्हणायची इच्छा नाही, पण मला खवळलं तर बघू, दोन्ही शहाणे नाहीत.तुम्ही कुणालाही पाडा आणि कुणालाही निवडणू आणा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे यांनी माघार घेतानाच मराठा समाजाला मोठा मेसेजही दिला. त्याशिवाय याला माघार म्हणता येणार नाही. हा गनिमी कावा आहे. असं देखील म्हणाले.

हेही वाचा: Maharashtra election 2024: मनोज जरांगे पाटील यांची विधान निवडणुकीतून माघार, अर्ज मागे घेण्याचा उमेदवारांना सूचना

काय म्हणाले मनोज जरांगे  ?

  • राजकारण आपला खानदानी धंदा नाही, पुन्हा आपण आपल्या जातीसाठी लढू.. आंदोलन सुरु ठेवणार आहे.
  • निवडणूक लढायचं नाही, पाडापाडी करायची नाही
  • मतदारसंघ ठरवले आहेत, याला माघार नाही म्हणता येत. एका जातीवर निवडून येत नाही. थोडक्यात गनिमीकावा म्हणा.
  • महायुती आणि महविकास आघाडी दोघांचाही काहीही उपयोग नाही दोघेही सारखेच आहेत.
  • समाजाला ज्याला मतदान करायचं त्याच्याकडून लिहून घ्या आणि व्हिडिओ करून घ्या.
  • मी कोणाला पाडा म्हणणार नाही कोणाला निवडून आला म्हणणार नाही.
  • समजाने ज्याला पडायचं त्याला पाडा, ज्याला निवडूण आणायचं त्याला आणा
  • समाजाची आठवण येत असल्याने डोळ्यात पाणी आले.

 

Web Title: Minister chagan bhujbal reply to manoj jarange patil stand for maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 02:45 PM

Topics:  

  • Chagan BhujBal
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil: “हे तर नुसती विमाने पळवत…”; मनोज जरांगे पाटलांची मोदी सरकारवर टीका
1

Manoj Jarange Patil: “हे तर नुसती विमाने पळवत…”; मनोज जरांगे पाटलांची मोदी सरकारवर टीका

Chagan Bhujbal: मुख्यमंत्रीपदावरून भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले, “माझ्या आयुष्यात दोन ते…”
2

Chagan Bhujbal: मुख्यमंत्रीपदावरून भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले, “माझ्या आयुष्यात दोन ते…”

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
3

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.