मुंबई – भिकेच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर अखेर मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलगिरी व्यक्त केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), फुले, कर्मवीर आपल्या रक्तारक्तात असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पैठण (Paithan) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचालित संतपीठाच्या पहिल्या प्रमाणपत्र वितरण सोहळा झाला. यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य वादाच्या (Controversial Statement) भोवऱ्यात सापडले होते.
केवळ सरकारी अनुदानावर (Government Grant) विसंबून राहू नका. देशात सध्या सर्व सरकारनेच करावे, अशी भावना निर्माण झाली आहे. यापूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांनी शाळा काढल्या. त्यासाठी सरकारी अनुदान घेतले नाही. भीक मागून शाळा उभ्या केल्या, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
वाद निर्माण झाल्यानंतर पाटील म्हणाले, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांना अॅप्रिशियट करतोय. ते सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. त्याला आताच्या शब्दांत वर्गणी म्हणू. सीएसआर म्हणू. मात्र, तेव्हा भीक मागितली म्हणायचे. सरकारच्या मदतीवर कशाला अवलंबून राहता, असे म्हणायचे असल्याचे सांगितले.