Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander News : विकासकामांच्या आढावा बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांची अनुपस्थिती;  प्रताप सरनाईकांचा संताप अनावर 

विकासकामांच्या आढावा बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांनी अनुपस्थिती दर्शविल्याने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या रागाचा पार चांगलाच चढला आहे. काय म्हणाले सरनाईक जाणून घ्या...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 08, 2025 | 05:53 PM
Mira Bhayander News : विकासकामांच्या आढावा बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांची अनुपस्थिती;  प्रताप सरनाईकांचा संताप अनावर 
Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर/ विजय काते : मिरा-भाईंदर शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी मिरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात विशेष बैठक आयोजित केली होती. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीसाठी विविध अधिकारी उपस्थित राहणार होते.

  • मिरा-भाईंदर महापालिका प्रशासन
  • एमआरडीए (मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण)
  • प्रादेशिक परिवहन कार्यालय
  • वन विभाग
  • अप्पर तहसीलदार कार्यालय
  • मिरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालय

तसेच शहरातील विकासकामे करणारे कंत्राटदार या विभागातील अधिकारी उपस्थित राहणं गरजेचं होतं. बैठकीच्या आधी संबंधित सर्व विभागांना लेखी सूचना व निमंत्रण देण्यात आले होते. शहराच्या कायदा व सुव्यवस्थेची बाजू मांडण्यासाठी पोलीस आयुक्त आणि उपायुक्त स्तरावरील अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र एवढं सांगूनही घटनेचं गांभीर्य लक्षात न घेता काही अधिकाऱ्य़ांनी अनुपस्थिती दर्शवली.

पोलीस प्रशासन अनुपस्थित – मंत्री संतापले

बैठकीला पोहोचल्यावर प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच होती. पोलीस आयुक्तालयातून केवळ वाहतूक विभागाचे उपायुक्त उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयुक्त किंवा अन्य वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले. यामुळे विविध विकासकामांवर निर्णय घेण्यास अडथळा निर्माण झाला.बैठकीदरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले. त्यावेळी मंत्र्यांच्या सचिवांनी पोलीस विभागाला वेळेवर पत्र पाठवूनही वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले नाहीत, अशी माहिती दिली. यावर सरनाईक यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

Raigad News : उरणमध्ये भीषण आग; ओएनजीसी प्रकल्पातून धुराचा लोट

मुख्य सचिवांकडे तक्रार

या गैरहजेरीबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांनी थेट राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी आदेश दिले. तसेच या घटनेची दखल कॅबिनेट बैठकीत घेतली जाईल, आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्ट जाब विचारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

विकासकामांवर परिणाम

या बैठकीत शहरातील रस्ते दुरुस्ती, जलनिस्सारण, वाहतूक व्यवस्था सुधारणा, सुरक्षा उपाययोजना आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आवश्यक योजना तयार करण्यावर चर्चा होणार होती. मात्र, पोलीस प्रशासनाचा सहभाग नसल्याने अनेक विषयांवर निर्णय घेणे आणि समन्वय साधणे कठीण झाले. शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने विकासकामांचा वेग मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रशासनावर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे प्रशासनातील समन्वयाचा अभाव, जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर उदासीनता यासारखे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांमध्येही या घटनेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, पुढील बैठकीत आणि कारवाईत काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिरा-भाईंदर शहरातील महत्त्वाच्या विकासकामांसाठी आयोजित केलेली बैठक पोलीस प्रशासनाच्या अनुपस्थितीमुळे विस्कळीत झाली. यावरून प्रशासनातील समन्वय आणि जबाबदारी याबाबत प्रश्न निर्माण झाले असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर भूमिका घेतली आहे. मुख्य सचिवांकडे तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला असून, पुढील कॅबिनेट बैठकीतही जाब विचारला जाणार आहे.

मोठी बातमी! आरक्षणाचा मुद्दा तापणार; ‘हा’ समाज आंदोलनाच्या तयारीत, सरकारची डोकेदुखी वाढणार?

Web Title: Mira bhayander news absence of police officers in the review meeting of development works pratap sarnaiks anger is uncontrollable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • mira bhaindar
  • Pratap Saranaik

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.