उरणमधील एका प्रकल्पाच्या ठिकाणी भीषण आग लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.महत्वाच्या आणि संवेदनशील ओएनजीसी प्रकल्पात मोठी आग लागण्याची घटना घडली असून, आग विझवण्यासाठी सीआयएसएफ आणि सिडको अग्निशमन दल प्रयत्न करत आहेत. तर या घटनेमुळे नागरिकांमध्ये घाबरातीचे वातावरण पसरले आहे. उरणमधील सर्वात मोठे ONGC हे नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकारण केंद्र असून, याकेंद्रातून नैसर्गिक वायू आणि तेल वितरण करण्यात येते. भारत सरकारकडून हा प्रकल्प संचालित असून वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने प्रकल्पसंदर्भात अनेक प्रश्न या अनुषंगाने उपस्थित राहात आहेत. घटनेची तीव्रता पहाता प्रकल्पतील कर्मचारी आणि आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आहे.
औद्यागिकदृष्ट्या पाहता उरण हे अतिशय महत्वाचं ठिकाण आहे. नुकत्याचा झाल्याले आगीच्या दुर्घटनेने परिसरात बचावकार्य सुरु करण्यात आलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच उरणमध्ये अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने बेकायदा वाहनतळाबाबतच्या समस्येने पुन्हा डोकं वर काढलं आहे. उऱण जेएनपीटी ते पळस्पे या मार्गावर दुचाकीस्वार जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते. याचं कारण म्हणजे रस्त्यालगत असलेले बेकायदा वाहनतळ. या बेकायदा वाहनतळांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या होत होती. दिवसेंदिवस ही समस्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असून याबाबत प्रशासन केवळ आणि केवळ आश्वासन देत असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. अपघाताचं प्रमाण वाढत चाललेल्या महामार्गावरील बेकायदा वाहन तळाचं करायचं काय ? ही समस्या कशी सोडवावी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ऐन गणेशोत्सावात देखील नागरिकांना या वाहतूक समस्येला तोंड द्यावं लागलं होतं.
मालाची ने-आण करण्यासाठी जेएनपीटी बंदर महत्वाचं ठिकाण आहे. याबंदर परिसरात अवजड वाहनांसाठी पार्किंग सुविधा आहे मात्र तरीही अनधिकृतपणे ज्या पद्धतीने मुख्य रस्त्यालगत वाहनं उभी केली जातात त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं स्पष्ट होत आहे.