Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेट्रोच्या कामात येणार तेजी? MMRDA कडून १२,००० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांना मंजुरी

मेट्रो प्रकल्पांसाठी MMRDA कडून ₹१२,००० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्यासाठी १९ महत्त्वाच्या कंत्राटांना मंजुरी मिळाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 24, 2025 | 07:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने आज एक ऐतिहासिक निर्णय घेत, मुंबईतील वाहतूक व्यवस्थेच्या आमूलाग्र सुधारणा करण्याच्या दिशेने ₹12,000 कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या १९ महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांना मंजुरी दिली. ही मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात, आणि आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या पुढाकाराने घेण्यात आली.

Matheran News: माथेरान वाहनतळचा विस्तार, विकेंडमध्ये होणारी वाहतूक कोंडींची होणार समस्या दूर

या निर्णयानुसार मेट्रो मार्ग २A, २B, ४, ४A, ५, ६, ७, ७A आणि ९ यांसाठी विविध घटकांसाठी रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग, सिव्हिल वर्क्स, पॉवर ट्रॅक्शन, AFC प्रणाली, डेपो सुविधा आणि मल्टी-मोडल इंटिग्रेशन एकूण १९ कंत्राटांना मान्यता देण्यात आली आहे. प्रमुख प्रकल्पांमध्ये मेट्रो लाईन ४ व ४A साठी ₹४,७८८ कोटींचे एल अँड टीला एकात्मिक प्रणालीसाठी दिलेले कंत्राट, मेट्रो लाईन ६ साठी ₹२,२६९ कोटींचा रोलिंग स्टॉक व पॉवर सिस्टमचा करार, तसेच ₹५३५ कोटींच्या मल्टी-मोडल इंटिग्रेशन प्रकल्पांचा समावेश आहे. या शिवाय अटल सेतू (MTHL) प्रकल्पासाठी ₹५५१ कोटींच्या ITS व ATMS प्रणालीसाठीचा खर्चही मंजूर करण्यात आला.

मेट्रो स्थानकांवर फूट ओव्हरब्रिज बांधण्यासाठी ₹२०६ कोटींची दोन पॅकेजेसमध्ये कंत्राटे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच पायाभूत सुविधा डिजिटल निरीक्षण प्रणालीसाठी ₹११५ कोटींचे कंत्राट Censys Technologies ला देण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्र शासन केवळ आजच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नव्हे तर भविष्यातील मागण्यांची पूर्वकल्पना घेतलेली पायाभूत सुविधा निर्माण करण्यास कटिबद्ध आहे. एमएमआरडीएकडून मंजूर झालेली ही ₹१२,००० कोटींपेक्षा अधिक किमतीची गुंतवणूक मुंबईच्या एकात्मिक आणि समावेशक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने मोठे पाऊल आहे. या प्रकल्पामुळे आर्थिक गती, शहरी गतिशीलता आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल.”

विजय शिवतारे यांची अजित पवारांवर पुन्हा टीका; नेमकं काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की,“एमएमआरडीएकडून झालेली ही ऐतिहासिक मंजूरी महाराष्ट्र सरकारच्या जागतिक दर्जाच्या वाहतूक पायाभूत सुविधेच्या बांधणीसाठीच्या कटिबद्धतेचा पुरावा आहे. ₹१२,००० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीद्वारे आम्ही एक समतोल, शाश्वत आणि आधुनिक मेट्रो नेटवर्क घडवत आहोत.”  आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी यावर भर दिला की, “आज मंजूर झालेले प्रत्येक प्रकल्प हे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या एकात्मिक विकासात मोलाचा वाटा उचलेल याची खात्री करून घेतली आहे. सिस्टम्स इंटिग्रेशन, रोलिंग स्टॉक, ट्रॅक्शन पॉवर, AFC व मल्टी-मोडल इंटिग्रेशन या सर्व घटकांना जोडणारी ही कंत्राटे आम्ही ऑपरेशनल रेडिनेस लक्षात घेऊन मंजूर केली आहेत. शेवटच्या टप्प्याच्या जोडणीवर आमचा भर असून, प्रवाशांसाठी सहज, गतीशील आणि एकात्मिक वाहतूक संरचना निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.”

Web Title: Mmrda approves works worth over rs 12000 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 07:25 PM

Topics:  

  • Metro
  • MMRDA

संबंधित बातम्या

Metro 3 चे बांधकाम पूर्ण, सीएसएमटी, चर्चगेट, मंत्रालयही जोडलं जाणार, कुठून आणि कसा असेल मार्ग?
1

Metro 3 चे बांधकाम पूर्ण, सीएसएमटी, चर्चगेट, मंत्रालयही जोडलं जाणार, कुठून आणि कसा असेल मार्ग?

Thane Metro: ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! मेट्रो ४ आणि ४अ च्या पहिल्या टप्प्यासाठी ट्रायल रन सुरू
2

Thane Metro: ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! मेट्रो ४ आणि ४अ च्या पहिल्या टप्प्यासाठी ट्रायल रन सुरू

मुंबईची Monorail सेवा पुन्हा एकदा ठप्प; वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे MMRDA चा मोठा निर्णय
3

मुंबईची Monorail सेवा पुन्हा एकदा ठप्प; वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे MMRDA चा मोठा निर्णय

नागपूरची जगात ओळख! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या ‘डबल डेकर’ पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
4

नागपूरची जगात ओळख! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या ‘डबल डेकर’ पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.