मुंबईत सुरू असलेल्या गावठाणांचे रेखांकन गतीने पूर्ण करावे. रेखांकन पूर्ण झाल्यानंतर गावठाणामधील शेवटच्या नागरिकाला नागरी सुविधा मिळतील, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
अटल सेतू–मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग कनेक्टरच्या कामाला वेग आला असून महत्त्वाचे अभियांत्रिकी टप्पे पूर्ण झाले आहेत. 143 ठिकाणी पाया, 141 पियर्स आणि 653 गर्डर्सची उभारणी पूर्ण झाली आहे.
शहरात नागरिकांच्या तक्रारींचे थेट निवारण करण्यासाठी आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे शिवसेनेच्या वतीने भव्य लोकदरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील वेगवेगळ्या रस्ते प्रकल्पांसाठी लवकरच टेंडर प्रक्रिया देखील सुरू होईल. सरनाईक यांनी सांगितले की, घोडबंदर रोडवर रुंदीकरणाचे काम मान्सूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून कल्याण-तळोजा मार्गावर सुरू होणाऱ्या मेट्रो लाईन १२अ च्या शुभारंभासह मुंबई मेट्रो १२ च्या विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई मेट्रो लाईन २ बी ने कुर्ल्यातील हलव पुलावर दोन यू-गर्डर यशस्वीरित्या सुरू करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. विमानतळ फनेल झोनमध्ये उंचीच्या मर्यादा असतानाही एमएमआरडीए टीमने हे आव्हानात्मक काम…
MMRDA projects in Mumbai, Thane: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 2026-27 साठीचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेशातील सेवा सुविधा उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
मीरा भाईंदर येथील फ्लायओव्हर संदर्भात एक व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मेट्रो लाईन ९ प्रकल्पाचा भाग असलेल्या या डबल डेकर फ्लायओव्हरचे उद्घाटन फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार…
MMRDA ने दावोस २०२६ मध्ये २२६.६५ अब्ज डॉलर्सची ऐतिहासिक परदेशी गुंतवणूक मिळवली. टाटा समूहाने देखील ११ अब्ज डॉलर्सचा एआय इनोव्हेशन करार केला, तर भारत-स्वित्झर्लंड करारामुळे शाश्वत औद्योगिक विकासाला चालना मिळाली.
एआयवर आधारित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील भागीदारीचा टाटा समूहासोबत केलेला ११ अब्ज डॉलर्सचा करार समाविष्ट असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मोठ्या प्रमाणावर इनोव्हेशन सिटी उभारण्याचा त्यामध्ये समावेश आहे.
मुंबईकरांसाठी वर्षाखेर आनंदाची! ३१ डिसेंबरपासून मेट्रो ९ (दहिसर ते काशीगाव) आणि २-बी चे निवडक टप्पे सुरू होणार आहेत. प्रवासाचा वेळ वाचणार आणि वाहतूक कोंडी फुटणार.
मुंबईतील दोन मोठ्या उपनगरांना जोडणारा ठाणे-बोरीवली ट्विन टनेल प्रकल्प वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते बोरीवली प्रवास अवघ्या 12 मिनिटांत शक्य होणार आहे.
मुंबईतील महत्त्वाचा प्रकल्प असणारा ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामाला अखेर आज सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात होत आहे.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून मुंबई ते ठाणे प्रवास आता फक्त २५ मिनिटांत करणे सोपे होणार आहे. छेडानगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे पर्यंतच्या विस्तारीकरणाचे बांधकामाला सुरुवात करण्यात आले आहे.
मीरा-भाईंदर-दहिसर मेट्रो 9 आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-अंधेरी मेट्रो 7A प्रकल्पांसाठी पहिला मेट्रो कारशेड प्रकल्प भाईंदरमधील राय गावात बांधण्याची योजना होती. मात्र आता रद्द करण्यात आले.
डोंबिवलीतील ठाणे-ठाकुर्ली उन्नत उड्डाणपूल प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून रखडलेला होता. आता लवकरच या उन्नत मार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल.
माजी आमदार पंडित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाकडे तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, काम न करणाऱ्या ठेकेदारांच्या वर्कऑर्डर रद्द करून रिटेंडरिंग प्रक्रिया सुरू करण्याचा…
वाटप केलेल्या भूखंडांमध्ये १.५% फ्लोअर स्पेस इंडेक्स (FSI) आणि १५% व्यावसायिक घटक आहे, जो बाधित व्यक्ती स्वतंत्रपणे किंवा विकासकांद्वारे विकसित करू शकतात.