Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video: “मविआत गेले अन् ‘हिंदूहृदयसम्राट’ काढून थेट जनाब…”; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान दिवाळी संपताच प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. राज्यात आज राज ठाकरे यांनी डोंबिवली येथे मनसेच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 04, 2024 | 07:36 PM
Video: "मविआत गेले अन् 'हिंदूहृदयसम्राट' काढून थेट जनाब..."; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

Video: "मविआत गेले अन् 'हिंदूहृदयसम्राट' काढून थेट जनाब..."; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

Follow Us
Follow Us:

डोंबिवली: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान दिवाळी संपताच प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. दरम्यान आज राज ठाकरे यांनी डोंबिवली येथे मनसेच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. विद्यमान आमदार राजू पाटील यांना मनसेने डोंबिवलीमधून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

डोंबिवली येथील प्रचार सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “राज्यातील राजकारणात युती आणि आघाडीमध्ये कशाचाच ताळमेळ नाही. २०१९ मध्ये निवडणुका झाल्या. निकाल लागला आणि त्यात एक सकळचा शपथविधी झाला. काकांनी डोळे वटारल्यामुळे ते लग्न १५ मिनिटांत मोडले. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवल्या त्या कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे जाऊन बसले. अमित शहा यांनी अडीच मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिल होता, या कारणांमुळे ते तिकडे गेले. उद्धव ठाकरेंच्या समोर नरेंद्र मोदी यांनी संगितले होते की, आमचे पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील. अमित शह यांनी टेक सांगितले. तेव्हाच त्यांनी आक्षेप का नाही घेतला? ” असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेससोबर गेल्यावर सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे, सर्व फोटोमध्ये बाळसाहेब ठाकरे यांच्या आधीचे हिंदूहृदयसम्राट हे विशेषणच काढून टाकले. त्यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट करायला कोणीही तयार नाही. मी तर काही उर्दू फोटो पाहिलेत. त्यात त्याच्या आधी बाळसाहेबांच्या आधी जनाब असे लिहिलेले होते. स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी एवढ्या खालच्या पातळीवर गेले. महाविकास आघाडीत गेले आणि हिंदूहृदयसम्राट नाव काढून थेट जनाब बाळसाहेब ठाकरे असे लिहायला सुरुवात झाली. ”

“विचार नावाची गोष्टच नाहीत उरली. मग हे कॉँग्रेससोबत गेले, अडीच वर्षे संपली. हे इकडे पाहत होते. खालच्या खाली ४० आमदार गेले. मुख्यमंत्र्यांना माहितीच नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस सोबत राहणे अवघड होत असल्याचे सांगून एकनाथ शिंदे गेले. मात्र आता अजित पवार पुन्हा जवळ आले. आता काही करता येत नाही. राज्यात अनेक प्रश्न आहे. हे फक्त मजा करत आहेत. हे तुम्हाला गृहीत धरत आहेत.”

राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्या प्रचारसभेत महाविकास आघाडी, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. मात्र भाजपवर टीका करताना त्यांनी थोडासा हात आखडता घेतल्याचे पाहायला मिळाले. राज्यात प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. २० तारखेला राज्यात मतदान होणार आहे तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. तसेच निवडणून येणाऱ्या जागांवरच मी सभा घेणार असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे डोंबिवलीची जनता पुन्हा एकदा राजू पाटील यांना संधी देणार का हे पहावे लागणार आहे.

Web Title: Mns chief raj thakceray criticizes on uddhav thackeray about balasaheb thakceray for maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 07:32 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Modi-Adani Files News: डिलीट होण्यापूर्वी पाहून घ्या…; राज ठाकरेंनी शेअर केली मोदी-अदांनींवरील ‘ती’ वादग्रस्त डॉक्युमेंट्री
1

Modi-Adani Files News: डिलीट होण्यापूर्वी पाहून घ्या…; राज ठाकरेंनी शेअर केली मोदी-अदांनींवरील ‘ती’ वादग्रस्त डॉक्युमेंट्री

Dasara Melava 2026 : दसरा मेळाव्यात मोठा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात येणार राज ठाकरे? सेनेच्या बड्या नेत्याचा दावा
2

Dasara Melava 2026 : दसरा मेळाव्यात मोठा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात येणार राज ठाकरे? सेनेच्या बड्या नेत्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.