raj thackeray and eknath shinde
मुंबई : मागील अनेक वर्षापासून मनसे शिवाजी पार्कवर दिवाळीत दीपोत्सव हा भव्य दिव्य असा कार्यक्रम करत आहे. दरम्यान, वसुबारसेपासून म्हणजे आजपासून (२१ ऑक्टोबर २०२२) पासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत, (८ नोव्हेबंर २०२२) पर्यंत हा मनसे दीपोत्सव साजरा होणार आहे. आज वसुबारसेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. यासाठी हे दोघेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतिर्थावर दाखल झाले आहेत.
[read_also content=”उस्मानाबाद जिल्हा परिषद आंदोलनप्रकरणी, बच्चू कडू यांना उस्मानाबाद न्यायालयाने ठोठावला ५ हजारांचा दंड https://www.navarashtra.com/maharashtra/bachu-kadu-was-fined-five-thousand-rupess-by-the-osmanabad-court-338260.html”]
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर मनेसेच्यावतीने दीपोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भात दादरकर आणि मुंबईकरांना पत्र लिहिलं होत. कोरोनाच्या संकटामुळं दिवाळी साजरी करता आली नव्हती. मात्र यावेळी दिवाळीचा उत्साह आणि आनंद दिसतोय. त्यामुळं दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.