Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MNS News: “सरकार व सत्ताधारी पक्ष धर्मद्वेश पसरवून…”, हिंदू मुस्लीम राजकारण करणाऱ्यांवर मनसे नेते राजू पाटील यांनी सडेतोड टिका

डोंबिवली-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ भारतीय नागरीकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये डोंबिवलीतील तीन जणांचा समावेश होता. या घटनेनंतर भारतीयांमध्ये या घटनेच्या विरोधात तीव्र संतापाचा लाट उसळली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 25, 2025 | 05:53 PM
हिंदू मुस्लीम राजकारण करणाऱ्यांवर मनसे नेते राजू पाटील यांनी सडेतोड टिका (फोटो सौजन्य-X)

हिंदू मुस्लीम राजकारण करणाऱ्यांवर मनसे नेते राजू पाटील यांनी सडेतोड टिका (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

MNS Raju Patil News in Marathi : डोंबिवली-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ भारतीय नागरीकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये डोंबिवलीतील तीन जणांचा समावेश होता. या घटनेनंतर भारतीयांमध्ये या घटनेच्या विरोधात तीव्र संतापाचा लाट उसळली आहे. या घटनेचा काही लोक राजकीय फायदा घेऊन भावना भिडवण्याची काम करीत आहे. जे काम हजारो गोळ्या करू शकत नाहीत तेच काम तुमच्या आमच्या भावना भडकावून व धर्माचे विष कालवून ते सहज करू शकतात असे ट्वीट मनसे नेते राजू पाटील यांनी केले आहे.

Pahalgam दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव शिगेला; भारत-पाकिस्तानने संयम बाळगावा, संयुक्त राष्ट्र महासचिवांचे आवाहन

मनसेने नेते पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सध्या देशात देशभक्त व देशद्रोही, हिंदू-मुसलमान यावर सरसकट व्यक्त होणे व त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार सुरू आहेत , परिणामी आपला देश सामाजिक दृष्ट्या पोकळ होत चालला आहे याची पुर्णतः जाणीव या अतिरेक्यांना झालेली आहे. हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या नादात आपल्याच देशातला सामाजिक सौहार्द संपवून अजून एक पाकिस्तानी विचार या देशात आपण निर्माण करत आहोत का ? यावरही आपण विचार करणे आवश्यक आहे.ज्याअर्थी ते नराधम निष्पाप जीवांचे बळी घेताना धार्मिक शेरेबाजी करत आहेत व आपल्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत त्याअर्थी त्यांना हे पक्के माहित आहे की जे काम हजारो गोळ्या करू शकत नाहीत तेच काम तुमच्या आमच्या भावना भडकावून व धर्माचे विष कालवून ते सहज करू शकतात.

सध्या देशात देशभक्त व देशद्रोही,हिंदू-मुसलमान यावर सरसकट व्यक्त होणे व त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार सुरू आहेत , परिणामी आपला देश सामाजिक दृष्ट्या पोकळ होत चालला आहे याची पुर्णतः जाणीव या अतिरेक्यांना झालेली आहे. हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या नादात आपल्याच देशातला… pic.twitter.com/o7G2ctsbJd — Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 25, 2025

कारण सध्याच्या राजकारणाने धर्माच्या नावाची अफूची गोळी ‘सर्वांनाच’ दिली आहे. व यामुळेच जातीय दंगे भडकतील व हजारो निष्पाप जीव जातील अशी परिस्थिती सध्या आपल्या देशात आहे हे शत्रू जाणून आहे, आणि म्हणूनच ते हरामखोर हे सर्व करत आहेत. आता आपण विचार करायचे आहे की ही परिस्थिती का आली ? आता आपण ठरवायचे आहे की जे त्या नराधमांना पाहिजे ते करायचे की आपापल्या सद्सदविवेक बुद्धीचा वापर करून या फुटीरतावाद्यांचे मनसुबे मोडून काढायचे ? येणारा काळ कठीण असेल व अशावेळी देशात सर्व समाजात देशभक्तीची भावना व सलोखा कसा राहील हे पाहणे सरकारचे व सर्वच राजकीय पक्षांचे काम आहे.

जे घडले त्याबद्दल अनेकांचे अनेक प्रश्न आहेत. लोकांनी हिंदू म्हणूनच हे सरकार निवडून दिले आहे ना ? मग देशातला हिंदू हा केवळ हिंदू आहे म्हणून मारला जातोय याची जबाबदारी कोण घेणार ? सुरक्षा यंत्रणांकडून खूप गंभीर चूक झाली आहे असं का बरं वाटत नाही आपल्याला ? जेव्हा हे घडल तेव्हा सुरक्षा यंत्रणा कुठे होत्या ? सर्जिकल स्ट्राईक मोदी नी केली म्हणून सर्वांना सांगितला मग हा हल्ला कोणाच्या चुकीमुळे झाला ? ह्याचं उत्तर कोण देणार ? सरकार व सत्ताधारी पक्ष धर्मद्वेश पसरवून आपली जबाबदारी झटकू शकत नाही, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं सरकारला कधीतरी द्यावीच लागतील, असं ट्विट मनसे नेते राजू पाटील यांनी केलं आहे.

Pahalgam Terror Attack: आता पाकिस्तानची खैर नाही! “शत्रूराष्ट्राला कळायला पाहिजे की…”; माजी IAF प्रमुखांचे विधान

Web Title: Mns news mns leader raju patil slams those who indulge in hindu muslim politics news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 05:53 PM

Topics:  

  • MNS
  • Pahalgam Terror Attack
  • raju patil

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ
1

Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.