Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंदखेड राजा विकासाला गती! विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा; आणखी १२ गावांचा समावेश

विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्यामुळे सिंदखेड राजा परिसराच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. या निर्णयानंतर विकास आराखडे, पायाभूत सुविधा आणि शहरीकरणाशी संबंधित कामे अधिक वेगाने राबवता येणार आहेत. या प्रकल्पात जांभोरा, उंबरखेड, असोला, पिंपळनेरसह एकूण १३ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 27, 2026 | 09:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा परिसराच्या विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नगर विकास विभागाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (MSRDC) नवनगर प्राधिकरण म्हणून असलेली नियुक्ती रद्द करून त्याला विशेष नियोजन प्राधिकरण (Special Planning Authority) म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे परिसरातील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला असून, विविध प्रकल्पांना लवकरच गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Monsoon Health News : पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढला! उल्हासनगरच्या रुग्णालयात एका दिवसात आठ जण दाखल

विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्यानंतर विकास आराखडे तयार करणे, त्यांची अंमलबजावणी, नियोजन परवानग्या देणे, पायाभूत सुविधा उभारणे आणि शहरीकरणाशी संबंधित विविध कामांचे अधिकार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे असणार आहेत. त्यामुळे सिंदखेड राजा परिसराचा नियोजित आणि वेगवान विकास होण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात नव्याने जांभोरा, उंबरखेड, असोला, जवळखेड, निमखेड, आंभोरा, बोरखेडी बावरा, गिरोली खुर्द, गिरोली बुद्रुक, कुंभारी, पिंपळनेर, पळसखेड आणि झाल्टा या गावांचा समावेश करण्यात येणार आहे. या गावांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, वीज, औद्योगिक सुविधा आणि इतर नागरी पायाभूत सुविधांचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने केला जाणार आहे.

या निर्णयाचा कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. समृद्धी महामार्ग आणि जालना येथील कार्यान्वित ड्रायपोर्ट यांची जोडणी झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, डाळी, फळे तसेच कृषी प्रक्रिया उत्पादने कमी वेळेत निर्यात साखळीपर्यंत पोहोचू शकतील. त्यामुळे वाहतूक खर्च कमी होण्यास, शेतमालाला अधिक मूल्य मिळण्यास आणि निर्यातीला चालना मिळण्यास मदत होईल.

MSRTC Financial Loss: एसटी महामंडळाला ऐन पीक सीझनमध्ये कोट्यवधींचा फटका! एप्रिल-मे महिन्यात अपेक्षित उत्पन्न बुडाले

तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे परिसरात खासगी गुंतवणूक वाढण्यासह उद्योगधंद्यांना चालना मिळेल. त्यातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि सिंदखेड राजा परिसराचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Momentum for sindkhed rajas development granted special planning authority status

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 09:12 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.