MSRTC Financial Loss: एसटी महामंडळाला ऐन पीक सीझनमध्ये कोट्यवधींचा फटका! एप्रिल-मे महिन्यात अपेक्षित उत्पन्न बुडाले
एसटी ही नफा-तोट्याच्या गणितावर चालणारी संस्था नसली तरी एप्रिल आणि मे हे वर्षातील सर्वाधिक उत्पन्न देणारे महिने मानले जातात. यंदा मात्र या दोन्ही महिन्यांत महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.
चालू वर्षी (२०२६-२७) एप्रिल व मे मध्ये एसटीला मोठा तोटा सहन करावा लागला. गेल्यावर्षी (२०२५-२६) एप्रिलमध्ये १४ कोटी ३४ लाख ५२ हजारांचा नफा झाला होता. यंदा मात्र ७६ कोटी ४७ लाख १६ हजारांचा तोटा झाला. मे महिन्यात गेल्यावर्षी १४ कोटी ९५ लाख ६५ हजार नफा होता, तर यंदा ४८ कोटी ८९ लाख १३ हजारांचा तोटा झाला. यात्रा, जत्रा, लग्नसराई, शाळांना सुट्टी आणि भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. ३१ पैकी २१ विभाग तोट्यात गेले आहेत.
“आगार, विभाग, प्रादेशिक कार्यालयासह व्यवस्थापनातील सर्व ८ आगार विभाग, कार्यालयासह व्यवस्थापनातील सर्व केल्यास उत्पन्नात निश्चित वाढ होईल”, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.
एप्रिल २०२५: १४,३४,५२,००० रुपये नफा
एप्रिल २०२६: ७६,४७,१६,००० रुपये तोटा
मे २०२५: १४,९५,६५,००० रुपये नफा
मे २०२६: ४८,८९,१३,००० रुपये तोटा
शासनाने आर्थिक मागण्या मान्य करून कर्मचारी व अधिकारी दोघांनाही दिलासा दिला आहे. कर्मचारी नेमून दिलेले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, अधिकारी पूर्वीप्रमाणेच उदासीन दिसत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने आता उत्पन्नासाठी विविध उपाययोजना राबवायला हव्यात. यापूर्वी कधीही उत्पन्न वाढीसाठी महामंडळाच्या अध्यक्षांना किंवा परिवहन मंत्र्यांना बैठका घेण्याची वेळ आली नव्हती. मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दर आठवड्याला बैठका घेऊन प्रयत्न करीत असताना ज्यांचे हे काम आहे ते अधिकारी मात्र नुसत्या खुर्च्छा उबवत आहेत, असा आरोप बरगे यांनी केला.

