पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग बंद आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरु असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
दरम्यान पहिल्याच पावसाचा फटका मुंबईला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. दोन दिवसांपासून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडींचा फटका रुग्णवाहिकांनाही बसला. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे वाहनं विरुद्ध दिशेने मार्ग काढायला लागली आणि याचा फटका बाजूच्या लेनलाही बसला होता.