वंदे भारत स्लीपरची बोरघाटात चाचणी यशस्वी (फोटो- सोशल मिडिया)
वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसच्या प्रस्तावित सेवेमुळे मुंबई, पुणे आणि बंगळुरू या प्रमुख शहरांदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक आरामदायी होण्याची अपेक्षा आहे. बोरघाटातील भौगोलिक परिस्थितीमुळे या टप्प्यात रेल्वेचा वेग मर्यादित ठेवण्यात येणार आहे. घाटातून बाहेर पडल्यानंतर लोणावळा आणि कर्जतच्या पुढील मार्गावर ताशी ११० किलोमीटर वेगाने रेल्वे धावण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली आहे या एक्स्प्रेसमध्ये एकूण १६ वातानुकूलित डबे असतील. त्यामध्ये एसी थ्री टियरचे ११ डबे, एसी टू टियरचे चार डबे आणि एसी प्रथम श्रेणीचा एक डबा असेल. या गाडीची एकूण प्रवासी क्षमता ८२३ इतकी आहे.
आनंदाची बातमी! अवघ्या १३ तासांत गोव्यात…! नवीन वंदे भारत ट्रेन धावणार, मार्ग आणि वेळ जाणून घ्या
प्रस्तावित वेळापत्रक :
गाडी क्रमांक २७६५२ : बंगळुरू ते मुंबई :
– केएसआर बंगळुरू येथून रात्री १० वाजता प्रस्थान.
– धर्मावरम येथे रात्री १२.५० वाजता आगमन.
– वाडी येथे पहाटे ५.०५ वाजता आगमन.
– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी १.३० वाजता आगमन.
गाडी क्रमांक २७६५१ : मुंबई ते बंगळुरू
– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १०.३० वाजता प्रस्थान.
– वाडी येथे सकाळी ७.२५ वाजता आगमन.
– धर्मावरम येथे सकाळी ११.४५ वाजता आगमन.
– बंगळुरू येथे दुपारी २.५० वाजता आगमन.
एका नजरेत गाडीची रचना
– एकूण डबे : १६
– एसी थ्री टियर : ११ डबे, ६११ बर्थ
– एसी टू टियर : ४ डबे, १८८ बर्थ
– एसी प्रथम श्रेणी : १ डबा, २४ बर्थ
– एकूण प्रवासी क्षमता : ८२३ प्रवासी






