Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला ठोठावला तब्बल ‘इतक्या’ लाखाचा दंड; कारण काय तर…

मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला खडेबोलही सुनावले आहे. पोलिसांकडून गैरवर्तन केले जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. यासंदर्भातील तक्रारी करूनही या तक्रारींकडे गांभीर्यानं पाहिले गेले नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 21, 2024 | 01:41 PM
मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला ठोठावला तब्बल 'इतक्या' लाखाचा दंड

मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला ठोठावला तब्बल 'इतक्या' लाखाचा दंड

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बुधवारी (दि.20) एकाच टप्प्यात मतदान झाले. अनेक मतदारांनी मतदानाचा हक्कही बजावला आहे. आता या निवडणुकीची मतमोजणी येत्या 23 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर नवीन सरकार स्थापन केले जाणार आहे. असे असतानाच आता मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला तब्बल एक लाखाचा दंड ठोठावला आहे.

हेदेखील वाचा : Pune Election: पुणेकरांनी मोडला गेल्या वर्षीच रेकॉर्ड; दिवसभरात तब्बल 65 टक्के झाले मतदान

मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला खडेबोलही सुनावले आहे. पोलिसांकडून गैरवर्तन केले जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. यासंदर्भातील तक्रारी करूनही या तक्रारींकडे गांभीर्यानं पाहिले गेले नाही. त्यामुळे, याप्रकरणी न्यायालयानं राज्य शासनाला हा दंड ठोठावला आहे. महाराष्ट्र सरकारला न्यायालयानं एक लाख रुपयाचा दंड सुनावला आहे. पोलिसांच्या गैरवर्तनासंदर्भात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

दरम्यान, एका अनधिकृत बांधकाम प्रकरणात 2012 मध्ये एका महिलेच्या पतीला पोलिसांनी बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली होती. न्यायालयाने याप्रकरणावर सुनावणीही घेतली होती. तक्रारदार महिला रत्ना वन्नम यांचे पती चंद्रकांत वन्नम यांच्यावर बेकायदेशीर बांधकामप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली होती. शेजाऱ्यांनी 20 हजार रुपयांची मागणी केली असता वन्नम यांनी ही मागणी नाकारली. ज्यानंतर त्यांची तक्रार करण्यात आली.

शेजाऱ्यांविरोधातील तक्रार घेण्यास नकार

पण, जेव्हा शेजारी आपला छळ करत असल्याचा आरोप त्यांनी पोलिसांकडे केला आणि तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी हद्दीचा मुद्दा उपस्थित करत तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. इतकेच नाहीतर चंद्रकांत वन्नम आणि बांधकामाच्या ठिकाणावरून इतर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

दंड भरूनही नाही सोडलं बाहेर

संबंधित पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांकडून वन्नम यांच्या सुटकेसाठी 12 हजार रुपयांची रक्कम मागण्यात आली होती. इतकेच नाहीतर प्रत्येक कामगाराच्या सुटकेसाठी 1200 रुपयांची मागणी झाली. हा दंड भरूनही चंद्रकांत यांना जामीन मिळेपर्यंत पोलिसांनी सोडलं नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

‘त्या’ कारवाईची नव्हती आवश्यकता

न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे आणि न्यायमूर्ती भारती डांग्रे यांच्या खंडपीठानं याप्रकरणी सुनावणी घेतली. वन्नम यांच्यावर अनधिकृत बांधकामप्रकरणी अटकेची कारवाई झाली असली तरी या कारवाईची आवश्यकता नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं.

वन्नम यांच्या पत्नीला एक लाखाची नुकसानभरपाई द्या

याचिकाकर्त्यांना पोलिसांच्या कारवाईमुळे झालेला मनस्ताप, जाधव यांच्यावर कारवाईचे निर्देश असतानाची त्याची अंमलबजावणी न होणं ही बाब अधोरेखित करत न्यायालयानं वन्नम यांच्या पत्नीला शासनानं एक लाख रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम द्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे वन्नम दाम्पत्याला हा एकप्रकारचा दिलासा असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेदेखील वाचा : एक्झिट पोलनुसार महायुती, ‘मविआ’त कांटे की टक्कर; सत्तास्थापनेत राज ठाकरे किंगमेकर ठरणार? पहा आतली बातमी

Web Title: Mumbai high court imposed a fine of one lakh to maharashtra government nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 01:41 PM

Topics:  

  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर टांगती तलवार? GR वर हायकोर्टाचा मोठा निर्णय
1

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर टांगती तलवार? GR वर हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maratha Reservation: विषय गंभीर! हैदराबाद गॅझेटबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; भुजबळ म्हणाले…
2

Maratha Reservation: विषय गंभीर! हैदराबाद गॅझेटबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; भुजबळ म्हणाले…

मुंबई उच्च न्यायालयाने Jolly LLB 3 वरील बंदीची मागणी फेटाळली; म्हणाले- “आमची तर थट्टा….”
3

मुंबई उच्च न्यायालयाने Jolly LLB 3 वरील बंदीची मागणी फेटाळली; म्हणाले- “आमची तर थट्टा….”

मराठा आरक्षण धोक्यात येणार? सरकारच्या GR ला हायकोर्टात आव्हान, याचिकेत नेमके काय?
4

मराठा आरक्षण धोक्यात येणार? सरकारच्या GR ला हायकोर्टात आव्हान, याचिकेत नेमके काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.