नाविन्यतेचा आधारस्तंभ म्हणून उदयास येत छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (CSMIA)ने डिजियात्रा व नॉन-डिजियात्रा प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी आपल्या अत्याधुनिक डिजिटल गेटवे उपक्रमाचे विस्तारीकरण केले आहे. टर्मिनल एण्ट्री पॉइण्ट्स (ईगेट्स)ची संख्या 24 वरून 68 पर्यंत वाढवण्यात आली आहे, जे देशामध्ये कर्बसाइड/लँडसाइडवरील सर्वाधिक ई-गेट्स आहेत. हे विस्तारीकरण विमानतळाची प्रोसेसिंग क्षमता टर्मिनल 2 (टी2) येथील प्रतितास 7,440 प्रवाशांपर्यंत आणि टी1 येथे 2,160 प्रवाशांपर्यंत वाढवेल, जे सध्याच्या क्षमतेच्या 3 पट अधिक आहे. डिजिटल गेटवेच्या सादरीकरणासह कर्बसाइडवरील प्रतिक्षा वेळ एक मिनिटापेक्षा कमी झाला आहे.
68 ईगेट्ससह आपल्या डिजियात्रा व नॉन-डिजियात्रा फॅसिलिटी विस्तारित करण्यासाठी पायाभूत सुविधेची केली निर्मिती
प्रवाशांसाठी अद्वितीय सोयीसुविधा सादर करत हे विस्तारीकरण अत्यंत उल्लेखनीय आहे. सीएसएमआयएच्या डिजिटल गेटवेमध्ये तंत्रज्ञान, प्रक्रिया सर्वोत्तमता, मोठे डेटा विश्लेषण आणि डिझाइन विचारसरणीचे फायदे समाविष्ट आहेत, ज्यामधून उत्तम प्रवासी अनुभव मिळतो. येथे, टर्मिनल एण्ट्री पॉइण्ट्सची संख्या 24 वरून 67 पर्यंत वाढवण्यात आली आहे, जे कोणत्याही प्रमुख नागरी कामाशिवाय प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपादित करण्यात आले. टी2 येथील डिजिटल गेटवेमध्ये आता 28 समर्पित डिजियात्रा ई-गेटस, तसेच 28 समर्पित नॉन-डिजियात्रा ई-गेट्स आहेत. तसेच, टर्मिनल 1 (टी1) मध्ये 5 समर्पित डिजियात्रा ई-गेट्स आणि 6 नॉन-डिजियात्रा ई-गेट्स आहेत, ज्यामुळे विमानतळाची एकूण क्षमता व प्रवासी अनुभवामध्ये अधिक वाढ झाली आहे.
सुरू असलेल्या विकासांतर्गत प्रवासी हालचाली अधिक सुलभ करण्यासाठी टी2 येथील प्री-एम्बार्केशन सिक्युरिटी चेक (PESC) येथे अतिरिक्त 118 ई-गेट्स तैनात करण्यात आले आहेत. बायोमेट्रिक सत्यापनासह डिजियात्रा प्रवासी ई-गेट्समधून जाऊ शकतात, ज्यासाठी त्यांचे तिकिट, बोर्डिंग पास किंवा ओळख पडताळणी दाखवण्याची गरज नाही. डिजिटल गेटवे सोल्यूशन प्रवाशांना ओळखण्यासह कार्यक्षमपणे मार्गदर्शन करण्यासाठी डिजियात्रा फाऊंडेशनसोबत एकीकृत केलेले विविध आयओटी सेन्सर्स आणि बायोमेट्रिक फेस पॉड्सचा फायदा घेते. हे तंत्रज्ञान प्रवासी अनुभवामध्ये अधिक सुलभता आणेल आणि नॉन-डिजियात्रा प्रवाशांसाठी प्रोसेसिंग वेळ कमी करेल.
पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्या डिजियात्रा प्रवाशांना साह्य करण्यासाठी ‘डिजि बडीज’ तैनात करण्यात आले आहेत, जे प्रवाशांना डिजियात्रा, सीयूएसएस, सीयूपीपीएस आणि एसबीडी अशा सेल्फ-सर्विस सिस्टम्सचा वापर करण्यामध्ये मार्गदर्शन करतील.आणखी एका पहिल्या प्रयत्नामध्ये सीएसएमआयए (CSMIA) कर्बसाइडवरील एकूण सिक्युरिटी सिस्टम वाढवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशिन लर्निंग सक्षम (AI/ML) कॅमेरे तैनात करेल.
[read_also content=”‘आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे’, कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/ncp-workers-demand-to-sharad-pawar-for-changing-mla-cnadidate-from-ajit-pawar-to-yugendra-pawar-baramati-politics-nrpm-546121.html”]
वाढती प्रवासी वाहतूक मागणी आणि अपेक्षित विकासाला अनुसरून विमानतळ रिअल-टाइम माहिती शेअर करण्यासह निर्णय घेण्याच्या प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. डिजिटल गेटवे उपक्रमाच्या लाँचसह सीएसएमआयएने पॅसेंजर इंटरअॅक्शन झोन्सना गतीमान करण्यासाठी परिवर्तनात्मक प्रवास सुरू केला आहे. हा प्रबळ डिजिटल प्लॅटफॉर्म, तसेच डायनॅमिक कन्टेन्ट दाखवणारे डिजिटल स्क्रिन्स प्रवाशांचे लक्ष वेधून घेतात आणि आवश्यक माहिती कार्यक्षमपणे प्रसारित करतात. सीएसएमआयए विमानतळ तंत्रज्ञानामध्ये नवीन मानक स्थापित करत आहे, तसेच प्रवाशांना विनासायास, कार्यक्षम व तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत प्रवास अनुभवामधून फायदा मिळण्याची खात्री घेत आहे.
[blockquote content=”आम्हाला सीएसएमआयए येथील आमच्या डिजिटल गेटवे प्लॅटफॉर्मवर डिजियात्रा सुविधेच्या मोठ्या विस्तारीकरणाची घोषणा करताना आनंद होत आहे. या उपक्रमामधून प्रवाशांच्या अनुभवामध्ये वाढ करणाऱ्या तंत्रज्ञान सुधारणांमध्ये अग्रस्थानी राहण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. ईगेट्सच्या आकडेवारीमध्ये वाढ करत आणि प्रगत बायोमेट्रिक सिस्टम्सचा समावेश करत आम्ही सर्व प्रवाशांसाठी सुखकर, सुरक्षित व विनासायास प्रवासाची खात्री घेण्याप्रती कटिबद्ध आहोत. कार्यक्षमता व सोयीसुविधा वाढवण्यासह सीएसएमआयएला एअरपोर्ट इनोव्हेशनमध्ये जागतिक लीडर बनवण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे” pic=”” name=”CSMI प्रवक्ता”]